पनवेल शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन वाईकर यांना ५० हजाराची लाच घेताना अटक
पनवेल ( वार्ताहर ) : अंतरिम जामीन नामंजूर करून वडिलांना अटक करेन अशी भिती दाखवत लाचेची मागणी करत 50 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पनवेल शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन वाईकर यांना अटक केली आहे.
तक्रारदार यांचे वडिलांचे विरुध्द पनवेल शहर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये कलम वाढ करून, तक्रारदार यांचे वडिलांचा अंतरिम जामिन नामंजूर करून त्यांना अटक करेन अशी भिती घालत असलेबाबत व अटक न करणेकरीता पनवेल शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन वामन वाईकर यांनी १ लाख रूपयांची मागणी करीत असल्याबद्दल तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती.त्यानुसार दिनांक २१ जुलै रोजी मारूती कुशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथे सापळा लावला असता पोलिस उपनिरीक्षक सचिन वामन वाईकर यांनी मागणी केल्याप्रमाणे लाचेची रक्कम 50 हजार रूपये सचिन वाईकर यांनी त्यांचे व्हॅगन आर कारमध्ये खाजगी इसम रविंद्र उर्फ सचिन सुभाष बुट्टे यांचेमार्फत स्वीकारल्याने आढळून आले.त्याचवेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.लाचलुचपत विभाग रायगडच्या पोलिस उपअधिक्षक सरिता भोसले,पोलिस निरीक्षक निशांत धनवडे,सहाय्यक फौजदार विनोद जाधव,पोलिस हवालदार महेश पाटील,पोलिस शिपाई नवदीत नांदगावकर यांनी ही कारवाई केली आहे.
Post a Comment