लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमच्या अध्यक्षपदी प्रेमेंद्र जयवंत बहिरा
पनवेल - लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमच्या अध्यक्षपदी प्रेमेंद्र जयवंत बहिरा यांची निवड झाली आहे.लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमने गेल्या वर्षात अतिशय चांगले उपक्रम आयोजित करुन डिस्ट्रिक्टमध्ये खूप अवॉर्ड मिळवले आहेत ही मोठी गोष्ट असून येणाऱ्या नवीन वर्षात सुद्धा सरगम क्लब प्रेमेंद्र बहिरा यांच्या अध्यक्षतेमध्ये अजून जोमाने कार्य करेल असा विश्वास माजी प्रांतपाल आणि मल्टिपल कौन्सिल चेअरमन राकेश चौमल यांनी व्यक्त केला, ते लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमचा पदग्रहण समारंभ आणि दुसरी चार्टर नाइट सोहळ्याच्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.हा सोहळा नुकताच गोखले सभागृह येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
यावेळी राकेश चौमल यांनी सन 2025- 26 या लायन वर्षासाठी प्रेमेंद्र बहिरा यांना अध्यक्षपदाची शपथ दिली.त्यांच्याबरोबर सचिव म्हणून आदित्य दोशी तर खजिनदार म्हणून धवल शहा यांनी सुद्धा आपल्या पदाची शपथ घेतली.यावेळी जयेश मणियार आणि संध्या महानुभाव यांना उपाध्यक्ष तर संजय गोडसे, स्वाती गोडसे, संविदा पाटकर, सुनील देशपांडे, मिलिंद जोशी, ओंकार खेडकर, अनिल परमार, सुषमा पन्हाळे आणि महेंद्र लोहार यांनी सुद्धा विविध पदांचा पदभार स्वीकारला.नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ खांदा कॉलनी येथील शाळेमध्ये वाचनालय सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे त्याचबरोबर आंतर महाविद्यालयीन कोळी नृत्य स्पर्धा,अन्न दान,चेक डॅमसारखे उपक्रम सुद्धा क्लबतर्फे घेण्यात आहेत.
मावळत्या अध्यक्षा मानदा पंडित यांनी गतवर्षी सर्व सभासदांकडून मिळालेल्या सहकार्यामुळेच गतवर्षी क्लबने चांगले काम केल्याचे सांगितले आणि सर्वाचे आभार मानले.
या कार्यक्रमात चिपळे शाळेतील विद्यार्थ्यांना दफ्तर वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती गोडसे यांनी केले तर आभार आदित्य दोशी यांनी मानले.याप्रसंगी माजी प्रांतपाल मुकेश तनेजा,मोहिनी तनेजा,धरमपाल चूघ, तुकाराम घोडके,मिलिंद पाटील,अनुप थरवाणी,मीना थारवानी, सुयोग पेंडसे,आलोक मिश्रा,नमिता मिश्रा,सत्यपाल चूघ,रमाकांत म्हात्रे, मदन गोवारी,राजेंद्र महानुभाव,धनंजय पाटील,सुरभी पेंडसे, शअशोक गिल्डा,अश्विनी खेडकर, सरिता सादराणी आदि मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment