मिशन पनवेल महानगरपालिका...शिवसेना ठाकरे पक्षाच्या निष्ठावंतांचा पदाधिकारी रविवारी कामोठ्यात मेळावा ... महाविकास आघाडी की स्वबळावर निवडणुका लढवायच्या यावर चर्चा होणार?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्ठावंतांचा पदाधिकारी रविवारी कामोठ्यात मेळावा आयोजित करण्यात आला आहे.महाविकास आघाडी की स्वबळावर येणाऱ्या निवडणुका लढवायच्या यावर चर्चा होईल.
रविवार दि.१५ जून सकाळी दहा वाजता कामोठे येथील आगरी समाज हॉल येथे या मेळाव्याच्या आयोजन रायगडचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केले आहे.या मेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री,शिवसेना नेते अनंत गीते मार्गदर्शन करणार आहेत.शिवसेना उपनेते सुरेंद्रनाथ माने,बबन पाटील,जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर,राज्य संघटक पनवेल विलास वाव्हळ हे उपस्थित राहणार आहेत.
Post a Comment