अहमदाबाद विमान दुर्घटना...लहानपणापासूनच हवाई सुंदरी बनण्याचं मैथिलीच स्वप्न
पनवेल - पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटील यांचे अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले.मैथिली ही अवघ्या 22 वर्षांची होती.मोठी झाल्यावर हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न तिनं उराशी बाळगलं होतं.स्वप्न पूर्ण झालं मात्र विमान अपघातानं सगळंच संपवलं आहे.या घटनेमुळे नवी मुंबई,पनवेल आणि उरण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
लहानपणापासूनच हवाई सुंदरी बनण्याचं स्वप्न :
आई-वडील,दोघी बहिणी आणि एकुलता एक भाऊ असलेल्या कुटुंबातील मैथिली ही थोरली मुलगी होती.पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील टी एस रहेमान शाळेत बारावीपर्यंतच मैथिलीनं शिक्षण घेतलं.लहानपणापासूनच हवाई सुंदरी बनण्याचं तिचं स्वप्न होतं.घरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती,तरीही हालाखीच्या परिस्थितीत मैथिलीनं शिक्षण पूर्ण केलं.दोन वर्षापूर्वी मैथिलीनं एव्हिएशनचं शिक्षण पूर्ण करून एअर इंडियात हवाई सुंदरी म्हणून ती रूजू झाली होती.न्हावा सारख्या ग्रामीण भागात राहून ये-जा करून मैथिली नोकरी सांभाळत होती.बुधवारी मैथिली लंडनला विमानात क्रू मेंबर म्हणून जायचं आहे,म्हणून न्हावा येथून निघून गेली.मात्र विमान अपघातानं सगळंच संपवलं आहे.
Post a Comment