News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

आम्ही लढणार...आम्ही जिंकणार... आगामी पनवेल महापालिका निवडणुकीत भगवा फडकावयाचा आहे - शिवसेना नेते अनंत गीते

आम्ही लढणार...आम्ही जिंकणार... आगामी पनवेल महापालिका निवडणुकीत भगवा फडकावयाचा आहे - शिवसेना नेते अनंत गीते

पनवेल (वार्ताहर) ः आगामी पनवेल महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भगवा फडकावयाचा आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच आम्ही लढणार... आम्ही जिंकणार... हे ब्रिद वाक्य घेवून घराघरात जा म्हणजे आपला विजय निश्‍चित असल्याचे मत शिवसेना नेते मा.खा.अनंत गीते यांनी आज कामोठे येथील आगरी समाज हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या मिशन पनवेल महानगरपालिका निष्ठावंत पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना केले.

यावेळी शिवसेना नेते मा.खा.अनंत गीते यांच्यासह शिवसेना उपनेते माजी आमदार सुरेंद्रनाथ (बाळ) माने, शिवसेना उपनेते बबन पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत, शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, राज्य संघटक विलास व्हावळ, जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, तालुकाप्रमुख ज्ञानेश्‍वर बडे, शहर प्रमुख रामदास गोवारी, प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, यतीन देशमुख, सूर्यकांत म्हसकर, प्रदीप केणी, गुरु म्हात्रे, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, महिला आघाडी तालुका संघटिका सौ. अनिता डांगरकर, उप तालुका संघटिका सौ. मीना सदरे, उपमहानगर संघटिका सौ, संचिता राणे, सौ.रुपाली कवळे, शहर संघटिका सौ. ज्योती मोहिते, सौ. अपूर्वा प्रभू, सौ. संपदा धोंगडे आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवसेना नेते मा.खा.अनंत गीते यांनी सांगितले की, आपल्याला ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे यासाठी कोणतीही तडजोड करण्यास आपण तयार राहिले पाहिजे. महाविकास आघाडी होईल किंवा नाही होईल हा नंतरचा भाग आहे. परंतु त्याचा निर्णय  पक्षश्रेष्ठी घेतील. परंतु ही निवडणूक सर्व बाजूने आपल्याला लढायची आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागून तशा प्रकारची बांधणीला सुरूवात करायची आहे, तसेच आगामी पनवेल महानगरपालिकेच्या वाढीव प्रॉपर्टी टॅक्स विषय तसेच लोेकनेते दि.बा.पाटील यांचे विमानतळाला नाव देण्यात यावे यासाठी शासनाविरोधात एल्गार मोर्चा आयोजित करणार असल्याचे गीते यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना शिवसेना उपनेते मा.आ.सुरेंद्रनाथ माने यांनी सांगितले की, पनवेल परिसरात शिवसेनेला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यंदाच्या निवडणुकीत भगवा फडकेल असा विश्‍वास वाटतोय. यासाठी सर्वांनी मतभेद बाजूला सारुन एकत्र या व मशाल चिन्ह हे घराघरात पोहोचवा असे आवाहन केले. 

शिवसेना उपनेते बबन पाटील यांनी सुद्धा आवेशपूर्ण भाषणात लोकांचा संपर्क वाढवा,मतदारांकडे जावून त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्या,लवकरच पनवेल महानगरपालिका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पनवेल शहरात करण्यात येईल.येथे लोकांचे प्रश्‍न सोडवा असे आवाहन केले तर जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी सुद्धा शिवसैनिक ही निवडणूक लढण्यासाठी सज्ज असून सर्व प्रकारचे विभागप्रमुख,शाखाप्रमुख,गटप्रमुख,महिला आघाडी आदींची जोरदारपणे बांधणी सुरू आहे.निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसैनिक उत्सुक असून पनवेलमधील अनुकूल वातावरण पाहता निश्‍चितच भगवा फडकेल असा सुद्धा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी सुद्धा शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सर्वांनी एकजुटीने व उद्धवजींचे हात बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करायचे आहे. निवडणुका या जिंकण्यासाठी असतात त्यामुळे विरोधकांची पळतीभुई करण्यासाठी एकत्र रहा,असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment