खारघर येथील गोल्डन कॉईन शॉपबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन ....गोल्डन कॉईन वाईन मार्ट या शॉपला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात यावी
मुंबई - खारघर येथील गोल्डन कॉईन वाईन मार्ट या वाईन शॉप संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि संघर्ष यांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांकडे निवेदन दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की,खारघर येथील नागरिकांचा
सुरूवातीपासूनच खारघरमध्ये दारू दुकाने व दारू बार येण्यास सक्तविरोध आहे.खारघर मध्ये दारूबंदी विषयी अनेक आंदोलने,निदर्शने झालेली आहेत.जानेवारी २००५ पासून संघर्ष संस्था,खारघर यांच्या माध्यमातून दारूमुक्त खारघर शहर घोषित करावे म्हणून शासनाकडे मागणी केली असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जन आंदोलन सुरू केले आहे.
गोल्डन कॉईन वाईन मार्ट हे नवीन वाईन शॉप सेक्टर ६, खारघर येथे उघडण्यात आले आहे. वाईन शॉपला सोसायटी किंवा पनवेल महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समजते.वाईन शॉपला परवानगी दिली असल्यास ती रद्द करण्यात यावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. खारघर येथील गोल्डन कॉईन वाईन मार्ट या शॉपला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात यावी.
निवेदन देतेवेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह प्रवीण पाटील,ब्रिजेश पटेल, शडॉ.वैभव बदाणे,त्रिवेणी सालकर,किर्ती मेहरा,संतोषी चौहान,जुमा चक्रवती,गायत्री खडवडकर,कॅ.कलावत,तुकाराम कंठाले,संदीप पाटील,मोहन म्हात्रे,शैलेंद्र त्रिपाठी आदी उपस्थित होते.
Post a Comment