खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिष्टमंडळाची पनवेलमधील प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास भेट
शिवसेना शिष्टमंडळाने पनवेलमधील प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास भेट दिली.
अदानी समूहातर्फे आत्तापर्यंत काम झालेल्या व भविष्यात होत असलेल्या प्रस्तावित कामांचे सुंदर प्रेझेंटेशन दिले.इंटर टर्मिनल कनेक्टिव्हिटी असणारा भारतातील हा पहिलाच एअरपोर्ट होणार आहे.यासह मेट्रो 1, मेट्रो 2, मेट्रो 3, वॉटर टॅक्सी, स्थानिक लोकल ट्रेन सेवा आणि भविष्यातील मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन यांची थेट कनेक्टिव्हिटी असेल.प्रदूषण रहित 'ग्रीन एअरपोर्ट' कन्सेप्ट राबविली जाणार असून विमानात इंधन भरण्याची अंडरग्राउंड पाईपलाईन (ASF) प्रणाली असणार आहे.सप्टेंबर 2025 पासून टर्मिनल 1 सुरू होणार ज्याची वार्षिक दोन कोटी प्रवासी क्षमता आहे.2029 पर्यंत टर्मिनल 2 सह जवळजवळ 80% कामकाज पूर्ण होणार. 2036 पर्यंत चार टर्मिनल्स, एक व्हीआयपी टर्मिनल, जनरल एव्हिएशन (खाजगी विमाने) देशातील सर्वात मोठे कार्गो डेपो असे संपूर्ण विमानतळ 100% विकसित होणार असून 3.7 किलोमीटरचा सर्वाधिक लांबीचा रनवे ज्यावर मोठी कार्गो विमाने व एअरबस A 380 सारख्या विमानांचे लँडिंग आणि उड्डाण शक्य होणार आहे.
मुंबईच्या सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ जवळ दुप्पट प्रवासी व विमानांच्या दळणवळणाची क्षमता या विमानतळाची असेल.यावेळी खासदार बारणे,अदानी एअरपोर्टच्या CEO मीनल नाईक,सिडकोच्या प्रोजेक्ट हेड गीता पिल्ले, जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे,महानगरप्रमुख प्रथमेश सोमण शिवसेनेचे सहकारी पदाधिकारी राजेंद्र यादव,अतुल भगत,विनोद साबळे, मंगेश रानावडे, महेश सावंत,सचिन मोरे,प्रसाद सोनावणे, प्रसाद परब,अतुल मोकल,सुनील गोवारी, प्रकाश म्हात्रे, रघुशेठ पाटील,मनोज घरत,मेघा दमडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment