News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

१२५ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त ...पनवेल महानगरपालिकेची प्लास्टिक विरोधी कारवाई

१२५ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त ...पनवेल महानगरपालिकेची प्लास्टिक विरोधी कारवाई

पनवेल: पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार  महानगरपालिकेच्या खारघर प्रभागांमध्ये प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात आली,यामध्ये सुमारे 125 किलो सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला तसेच सुमारे 10 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. 

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी मोठी प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात आली.यामध्ये प्रभाग समिती 'अ '  खारघर प्रभागामध्ये सेक्टर 35 नीलकंठ स्वीट,रावेची मार्ट असे विविध स्वीट मार्ट,बाजार अशा अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशवी (सिंगल युझ प्लास्टिक) बंदी कारवाई करण्यात आली.दरम्यान या कारवाई अंतर्गत सुमारे रुपये 10 हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला.यावेळी सुमारे 125  किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.या कारवाईवेळी स्वच्छता निरीक्षक कुणाल गायकवाड,अतुल मोहोकर,संदिप भोईर अतिक्रमण पथकाचे शिवदास पाटील व कर्मचारी उपस्थित होते.पनवेल महापालिका क्षेत्रात एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकवरती प्रतिबंध करण्यात आला आहे. शउपायुक्त डॉ.वैभव विधाते यांच्या सूचनेनुसार प्रतिबंधित प्लास्टिकची साठवणूक,विक्री आणि वापर करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्यावतीने कठोर कारवाई करण्यात येत आहे. 

प्लास्टिक विरोधी कारवाईमध्ये  पहिला गुन्हा नोंद झाल्यावर ५ हजार रुपये, दुसरा गुन्हा नोंद झाल्यावर १० हजार रुपये ,तिसरा गुन्हा नोंद झाल्यावर २५ हजार रूपये दंड आणि तीन महिन्याचा कारावास असणार आहे.तरी महापालिका कार्यक्षेत्रातील विविध आस्थापनांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम‌....
सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 नियम 4(2) अन्वयानुसार 1 जुलै 2022 पासून एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकचे उत्पादन,आयात, साठवण,वितरण विक्री आणि वापरांवर बंदी करण्यात आली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment