पनवेलच्या टॅक्स प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरे शिवसेना गटाच्या लीना गरड यांनी घेतली भेट .... लीना गरड शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेणार?
पनवेल- पनवेलच्या टॅक्स प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरे शिवसेना गटाच्या खारघर येथील लीना गरड यांनी भेट घेतली, या भेटीने पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आल आहे.
मालमत्ता कराचा विषय घेऊन पनवेल महापालिकेत रान उठवणाऱ्या आणि वेळप्रसंगी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन उबाठा शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीत 44 हजार राहून जास्त मते घेत सर्वांना चकित करणाऱ्या सौ.लीना गरड यांनी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्या मध्यस्थीने व पुढाकाराने लीना गरड व शिंदे यांची भेट झाल्याचे समजते.ही भेट निव्वळ टॅक्स प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी होती,असे जरी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले तरी राज्यातली आणि देशातली राजकीय परिस्थिती व येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका बघता लीना गरड शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Post a Comment