नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिक युवकांना रोजगार देण्याबाबत शरद पवार यांचे आश्वासन ... राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष सतीश मोहन पाटील यांचे निवेदन
पनवेल - पनवेलमधील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थानिक युवकांना रोजगार देण्याबाबत शरद पवार यांनी आश्वासन दिले आहे,यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष सतीश मोहन पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून शरद पवार यांना निवेदन (पत्र)दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी,सतीश पाटील यांनी दिलेल्या पत्रानुसार,पनवेल शहर विभागाकडून करण्यात आलेल्या स्थानिक युवकांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोजगार देण्याच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
या विषयावर झालेल्या एका फलदायी बैठकीत शरद पवार यांनी पनवेल व परिसरातील शिक्षित व पात्र युवकांना विमानतळावरील विविध पदांवर भरतीसाठी प्राधान्य देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील,असे आश्वस्त केले.या बैठकीस बीव्हीजी कंपनीचे सीईओ श्री.हनमंतराव गायकवाड सुद्धा उपस्थित होते.त्यांनी या उपक्रमाला आपला पाठिंबा दर्शवून स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.
या निर्णयाचे स्थानिक जनतेकडून मनःपूर्वक स्वागत करण्यात आले असून,या उपक्रमामुळे स्थानिक बेरोजगारीवर उपाय मिळेल आणि सर्वसमावेशक विकासाला चालना मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Post a Comment