News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोमसापतर्फे साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन ....कविसंमेलन,परिसंवाद ,सन्मान पुरस्कार,अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोमसापतर्फे साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन ....कविसंमेलन,परिसंवाद ,सन्मान पुरस्कार,अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

पनवेल(प्रतिनिधी) - दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्यावतीने एक कृतार्थ संध्याकाळ या साहित्यिक कार्यक्रमांतर्गत कवी संमेलन परिसंवाद,सन्मान पुरस्कार,अभिष्टचिंतन सोहळा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१ जून २०२५ रोजी पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयाच्या सभागृहात होणाऱ्या या साहित्यिक कार्यक्रमांमध्ये दुपारी २ वाजता कवी संमेलन होणार आहे. या कवी संमेलनासाठी कवी, चित्रपट निर्माते,दिग्दर्शक रामदास फुटाणे, सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर, सुप्रसिद्ध साहित्यिक अरुण म्हात्रे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संपर्कप्रमुख रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४ वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर एक बहुआयामी व्यक्तिमत्व... या विषयावर परिसंवाद होणार आहे.या परिसंवादामध्ये पनवेलमधील सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे,सुप्रसिद्ध साहित्यिक अरुण म्हात्रे, संपादक शैलेश शिर्के,महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर सहभागी होणार आहेत.

सायंकाळी ५ वाजता लोकनेते,माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक,कवी,चित्रपट निर्माते, दिग्दर्शक रामदास फुटाणे,आमदार महेश बालदी,आमदार प्रशांत ठाकूर,आमदार विक्रांत पाटील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत,सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर,कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षा नमिता कीर,कार्याध्यक्ष व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ, सुप्रसिद्ध साहित्यिक अरुण म्हात्रे,जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय.टी देशमुख,पनवेल महानगरपालिकेचे माजी गटनेते परेशशेठ ठाकूर,कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख रायगड भूषण प्रा‌.एल.बी.पाटील,कोमसाप रायगडचे अध्यक्ष सुधीर शेठ उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यात पनवेलचे नाव उंचवणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्मान पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.या साहित्यिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment