पनवेल महानगराच्या नागरी वसाहतीमधील पावसाळा पूर्वीची कामे पूर्ण करा - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरपालिकेला निवेदन
पनवेल - पनवेल महानगरपालिका अंतर्गत क्षेत्रातील पनवेल शहर,नवीन पनवेल,खांदा कॅालनी,कामोठे, कळंबोली,तळोजा व खारघर नागरी वसाहतीमधील पावसाळा पूर्वीची कामे आजपर्यंत पूर्ण झालेली नाहीत,त्यामुळे अवकाळी झालेल्या पावसाने पूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनेक नागरी भागात पाणी साचल्याने व घरात पाणी शिरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे तसेच छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले. सदराची बाब लक्षात घेता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रायगड श्री.शिरीष घरत यांच्यावतीने आज पनवेल महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री.गणेश शेट्टे यांच्या दालनात बैठक घेऊन सदारचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता निवेदन दिले.
यावेळी पनवेल महापालिका तळोजा अंतर्गत येणर्या सर्व शहरातील प्रश्न अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे मांडण्यात आले.त्यामध्ये तळोजा येथे जाण्याकरिता एकच मार्ग आहे तो म्हणजे तळोजा अंडरपास. सदरचा रस्ता हा पावसाळ्यात पाणी साचून भरला जातो त्यामुळे ये-जा करणा-या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो याचा पर्यायी मार्ग म्हणून रेल्वेच्या जवळचा ब्रिड्ज (पूल) येथून मार्ग काढावा अशी विनंती करण्यात आली. तसेच तक्का पनवेल गाढीनदीच्या पात्रात के.टी.अँड एल.के.स्वीट होमर्स बिल्डर्स यांनी पन्नास ते साठ फुट उंचीचा मातीचा भराव नदीपात्रात केलेला आहे. त्यामुळे काळुंद्रे गावाला पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. संबंधित बिल्डरवर योग्य ती कारवाई करून काम तत्काल थांबविण्यात यावे व बिल्डरला नदीच्या पात्रातून केलेला भराव त्वरित काढवयास सांगावे अशी विनंती अर्ज केला.कामोठे येथील रस्त्यालगतची तसेच गार्डन व इतर ठिकाणच्या वृक्षांची छाटणी करणे, ड्रेनेज लाइन सफाई व गाळ काढणे,घनकचरा रोजच्या रोज उचलणे,शहरातील अधिकृत व अनधिकृत होर्दिंग्सची शहानिशा करून अनधिकृत व असुरक्षित होर्द्दिंग्स वर तत्काल कारवाई करावी अशी विनंती अर्ज यावेळी केला. खारघर सेक्टर-५ येथील कावेरी सोसायटीची भिंत पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेली आहे ती भिंत लवकरात लवकर बांधून पूर्ण करावी.या सर्व प्रश्नाची शहानिशा करून योग्य तो मार्ग काढावा अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेच्या माध्यमातून जन आंदोलन करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील,महानगर समन्वयक दिपक घरत,महानगरप्रमुख अवचित राऊत, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव,खांदाकॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के,कामोठे शहर प्रमुख रामदास गोवारी,तळोजा शहर प्रमुख प्रदीप केणी,शहर संघटक संतोष गोळे,विभाग प्रमुख नंदू घरत, गणेश खांडगे उपस्थित होते.
Post a Comment