News Breaking
Live
wb_sunny Jun, 20 2025

Breaking News

फेसबुकवरील मैत्रिणीची भुरळ; ट्रेडिंगमध्ये गमावले ४१ लाख

फेसबुकवरील मैत्रिणीची भुरळ; ट्रेडिंगमध्ये गमावले ४१ लाख

पनवेल  (वार्ताहर) ः फेसबुकवरून मैत्री वाढवून सायबर गुन्हेगारांनी महिलेच्या नावे एकाची 41 लाख 82 हजारांची फसवणूक केली आहे.आपण ट्रेडर असल्याचे सांगून या महिलेने त्यांना एका लिंकवर पैसे गुंतविण्यास सांगितले होते.तिच्यावर विश्‍वास ठेवून ऑनलाईन पैसे पाठविल्यानंतर या व्यक्तीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

पनवेल परिसरातील 35 वर्षीय व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे.गतवर्षी त्यांना एका महिलेने फेसबुकवर फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवली होती.या सायबर गुन्हेगारांनी महिलेच्या नावे गंडविले,पोलिस पनवेल शहर ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू व्यक्तीने तिच्या मैत्रीचा स्वीकार करताच तिच्या मागणीवरून या व्यक्तीने त्याचा मोबाईल नंबर तिला दिला होता.त्यानुसार दोघांमध्ये अनेक दिवस चॅटिंगद्वारे गप्पा सुरु होत्या.यादरम्यान आपण ट्रेडर असून, एका कंपनीसाठी काम करत असल्याचे या महिलेने सांगितले तर या व्यक्तीला देखील ट्रेडिंगमधून पैसे कमावण्याची इच्छा होती,त्यामुळे महिलेच्या सांगण्यावरून त्यांनी टप्प्याटप्प्याने एकूण 41 लाख 82 हजार रुपये ऑनलाईन गुंतवले होते. मात्र त्याचा मोबदला त्यांना मिळाला नाही.शिवाय मैत्रिणीनेही संपर्क ’तोडला.त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment