ओरायन मॉलचा रविवारी नववा वर्धापन दिन ... शॉप अँड विन महापुरस्कार विजेत्यांची होणार घोषणा ...अभिनेत्री स्मिता शेवाळे,नेहा नाईक,इशा डे,अभिनेते समीर चौघुले यांची उपस्थिती
पनवेल - (वार्ताहर) ः पनवेल शहरातील ओरायन मॉलचा नववा वर्धापन दिन रविवार दि २७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.या वर्धापन दिनी नऊ विजेत्यांना ओरायन मॉलच्या माध्यमातून विशेष आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.याकरिता मॉल प्रशासनाने आयोजित केलेल्या शॉप अँड विन कॉन्टेस्टच्या विजेत्यांची निवड तब्बल चार मराठी सेलेब्रिटी करणार आहेत.या मराठी सेलेब्रिटीमध्ये स्मिता शेवाळे,नेहा नाईक समीर चौघुले,इशा डे आदी उपस्थित राहून पनवेलकरांशी संवाद साधणार असल्याची माहिती ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर आणि मनन परुळेकर यांनी दिली.दरम्यान नऊ विजेत्यांपैकी प्रथम विजेत्याला यामाहा फसिनो स्कुटर आणि द्वितीय विजेत्यांना आय पॅड व इतर विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.रविवारी दि.२७ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वेळी हा लकी ड्रॉ स्वतः सेलेब्रिटी विनर घोषित करणार येणार आहेत.
Post a Comment