News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मुलीची हत्या करून महिलेची आत्महत्या‌... तळोजाच्या पेठाली येथील घटना

मुलीची हत्या करून महिलेची आत्महत्या‌... तळोजाच्या पेठाली येथील घटना

पनवेल (वार्ताहर) ः तळोजा परिसरातील पेठाली गावात राहणार्‍या एका 30 वर्षीय महिलेने चार वर्षांच्या मुलीला उशीने गुदमरून मारले. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.सोनम अभिषेक केणी असे मृत महिलेचे नाव आहे.सोनम या मुलगी देवांशी हिला घेऊन वरच्या खोलीत झोपण्यासाठी गेल्या,मात्र सायंकाळी पावणेसहा वाजले तरी त्यांनी दरवाजा न उघडल्याने घरातल्या मंडळींना संशय आला.खोलीत देवांशी मृतावस्थेत आढळली आणि सोनम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी पाहिले.मागील वर्षी एक वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्यापासून सोनम तणावात असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत हे अधिक तपास करत आहेत.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment