पनवेलमध्ये लाच घेताना महावितरणचे दोन अभियंते लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
पनवेल : पनवेलमधील महावितरणच्या भिंगारी विभागातील दोन अभियंत्यांना 1 लाख 84 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई पथकाने रंगेहात अटक केली.या प्रकरणाने संपूर्ण वीज वितरण खात्यात खळबळ उडवली आहे.याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी उपकार्यकारी अभियंता संदीप आण्णासाहेब डावरे (वर्ग 2) आणि कनिष्ठ अभियंता प्रथमेश नवचंद्र चोगुले (वर्ग 3) हे दोघेही पनवेलच्या भिंगारी विभागात कार्यरत होते.महावितरण कंपनीच्यावतीने सदर तक्रारदार फर्मला दोन सिव्हिल वर्कची कामे देण्यात आली होती.त्यानुसार मार्च अखेरीस एका सिव्हिल वर्कच्या कामाचे बिल मंजूर होऊन कंपनीच्या खात्यावर बिल जमा झाले होते.परंतु दुसर्या कामाच्या बिलासंदर्भात साइट व्हिजिट व बिल मंजुरीसाठी डावरे व चौगुले या दोघांनी प्रत्येकी 92,000 रुपये अशी एकूण 1.84 लाख रुपयांची लाच मागितली होती. या बाबतची तक्रार 24 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार स्वरूपात नोंदवण्यात आली.त्यानंतर पडताळणी करण्यात आली आणि आरोपींची लाच मागणी खरी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आज 25 एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला.तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे दोन्ही अभियंत्यांना प्रत्येकी 92 हजार रुपये दिले आणि त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई पथकाच्या अधिकार्यांनी साक्षीदारांच्या समोर रंगेहात अटक केली.लाच स्वीकारण्याची ही कारवाई थेट महावितरण विभाग भिंगारी विभागाच्या कार्यालयात पार पडली. या संपूर्ण सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक संतोष पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई पथकाने यांनी केले.सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे,पोलिस.उपनिरीक्षक.नि.जाधव, पोलिस नाईक विशाल अहिरे,पोलिस शिपाई यांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली.
Post a Comment