आज भाजपामध्ये कोण पक्ष प्रवेश करणार? याची उत्सुकता .....भाजपा नेते,राज्याचे मंत्री अशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये पनवेलमध्ये सायंकाळी होणाऱ्या जाहीर सभेमध्ये सत्कार समारंभ व पक्षप्रवेशाचा कार्यक्रम
पनवेल - भाजपा नेते,राज्याचे मंत्री अशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये पनवेलमध्ये आज रविवार दि.२७ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मार्केट यार्ड येथे होणाऱ्या जाहीर सभेमध्ये सत्कार समारंभ व पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.यात होणाऱ्या पक्षप्रवेशाच्यावेळी भाजपामध्ये कोण-कोण प्रवेश करेल याची उत्सुकता लागली आहे.सदर जाहीर सभेचे आयोजन उत्तर रायगड भाजपातर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment