News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलमध्ये शेकापला तर खालापूर तालुक्यात काँग्रेसला मोठा दणका ..... शेकापचे नेते प्रभुदास भोईर हजारो समर्थकांसह भाजपात

पनवेलमध्ये शेकापला तर खालापूर तालुक्यात काँग्रेसला मोठा दणका ..... शेकापचे नेते प्रभुदास भोईर हजारो समर्थकांसह भाजपात

पनवेल (प्रतिनिधी)-  आपल्या परिसराचा विकास व्हावा यासाठी विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते  भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घवघवीत यशस्वी कामगिरी केली आहे. तसेच पनवेल मतदार संघात देखील पक्षाला चांगले यश मिळाले असून येणाऱ्या काळात आपले आणखी आमदार वाढणार आहेत. आपला विभाग मजबूत करा. पनवेल महापालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीकोनातून कामाला लागा. भाजपमध्ये ज्या वेगाने पक्ष प्रवेश होतोय त्यामुळे येणाऱ्या काळात हा जिल्हा संपूर्ण भाजपमय होईल असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी करतानाच 'आगे आगे देखो होता है क्या' असे सूचक वक्तव्य केले.  
भारतीय जनता पार्टीत विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश आणि उत्तर रायगड जिल्हयातील नवनियुक्त मंडल अध्यक्षांचा सत्कार समारंभ पनवेलमध्ये संपन्न झाला.माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ऍड. आस्वाद पाटील,ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत,जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील,दीपक बेहेरे,उपाध्यक्ष जयंत पगडे,सुधीर ठोंबरे,उरण तालुका माजी अध्यक्ष रवी भोईर, माजी नगरसेवक अनिल भगत, विजय चिपळेकर,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील,जीवन गावंड,अमित जाधव, ज्ञानेश्वर घरत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर,अभिषेक भोपी,यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शेकापला लागलेली घरघर थांबण्याचा नाव घेत नाही.नुकताच अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील, ॲड.आस्वाद पाटील आणि त्यांच्या हजारो समर्थकांनी प्रवेश करत अलिबागमध्ये शेकापला जोरदार धक्का दिला.आता शेकापच्या वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभुदास भोईर ऊर्फ प्रभूअण्णा यांनी त्यांच्या जवळपास पंधराशे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा दणका दिला. तसेच खालापूर तालुक्यातील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष काँग्रेसनेते कृष्णाशेठ पारंगे यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रभुदास भोईर यांचे आशिष शेलार यांच्या हस्ते पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत करण्यात आले तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कृष्णाशेठ पारंगे यांना प्रवेश देण्यात आला. 
उत्तर रायगड जिल्हयातील नवनियुक्त खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, नेरे मंडल भूपेंद्र पाटील, कामोठे मंडल विकास घरत, पनवेल शहर मंडल सुमित झुंझारराव, कळंबोली मंडल अमर पाटील, नवीन पनवेल मंडल दशरथ म्हात्रे, तळोजा मंडल दिनेश खानावकर, कर्नाळा मंडल मंगेश वाकडीकर, उलवा मंडल रुपेश धुमाळ, उरण शहर मंडल प्रसाद भोईर, उरण ग्रामीण मंडल धनेश गावंड, कर्जत शहर मंडल राजेश लाड, कर्जत ग्रामीण मंडल दिनेश रसाळ, खालापूर पश्चिम मंडल प्रवीण मोरे, खालापूर पूर्व मंडल सनी यादव, खोपोली मंडल राहुल जाधव, नेरळ मंडल नरेश मसणे यांचा या सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

प्रभूअण्णा यांच्यासोबत वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष अतुल मारुती घरत,कार्याध्यक्ष विजय भोईर,माजी नगरसेविका प्रिया भोईर,प्रदेश खजिनदार भूषण म्हात्रे,कोन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक म्हात्रे,माजी पंचायत समिती सदस्य गुरुनाथ ठाकूर,समीर दळवी, ग्रामपंचायत सदस्य गोरख धुमाळ,विश्वनाथ शेळके,विशाल घरत,पनवेल तालुका वाहतूक अध्यक्ष प्रभाकर नाईक यांचासह शेकापच्या हजारो कार्यकर्त्यांनी तसेच कृष्णाशेठ पारंगे यांच्यासोबत चांभार्ली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिप पाटील,दापिवलीचे सुरेश गाताडे, देवळोलीचे माजी सरपंच रोहिदास पाटील, ग्रामपंचायत सदस्य सचिन चाळके,समीर दळवी,ललिता पडवळ,किशोर शिंदे,आनंद चव्हाण,प्रल्हाद शिंदे,मनसेचे बारवई अध्यक्ष सचिन पडवळ यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.या प्रवेशामुळे पनवेलमध्ये शेकापला तर खालापूर तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment