शेकाप युवानेते निलेश म्हात्रे आणि उरण पंचायत समितीच्या माजी सभापती समिधा म्हात्रे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश !!!
पनवेल - शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचे खंदे समर्थक युवानेते निलेश म्हात्रे आणि उरण पंचायत समितीच्या माजी सभापती समिधा म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये पनवेल येथे जाहिर पक्ष प्रवेश केला,त्यांचे भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी पक्षात स्वागत केले.याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर,उत्तर रायगड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष अविनाश कोळी,भाजपा नेते बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. निलेश म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशामुळे शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
Post a Comment