News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान ....पनवेलमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध

शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान ....पनवेलमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध

पनवेल -  शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल
पनवेलमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज निषेध करण्यात आला.

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकर्‍यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शेतकर्‍यांची मने दुखावली गेली आहेत,कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड श्री.शिरीष घरत यांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पनवेल येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून त्यांच्या जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. 
यावेळी जेष्ठ शिवसैनिक व उपमहानगर संघटक आत्माराम गावंड,रामदास गोंधळी,पनवेल शहर प्रमुख प्रविण जाधव, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख,खांदा‌ कॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के,कळंबोली शहर प्रमुख सुर्यकांत म्हसकर,कामोठे शहर प्रमुख रामदास गोवारी,युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते,शहर संघटक संतोष गोळे, विभाग प्रमुख अनिल तळवणेकर,कुणाल कुरघोडे,किरण सोनावणे,निखिल भगत,दौलत होटकर,राम जाधव,राजेश शेट्टीगार,गोविंद जोग,मृन्मय काणे, भास्कर पाटील,मयूरेश पाटील,माहिला आघाडी तालुका संघटिका सौ.प्रमीला कुरघोडे, कळंबोली शहर संघटिका सौ.ज्योती मोहिते,सौ. उजव्ला गावडे,सौ.श्रद्धा कदम,शहर संपर्क संघटिका सौ. रत्नमाला शिंदे,समीक्षा पगम,सुप्रिया भगत,समिना कुडाळकर यांच्या सह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment