News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलच्या न्यायालयातील दोन वकील झाले प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी.....न्यायाधिश होण्याचे स्वप्न बाळगून अभ्यास!

पनवेलच्या न्यायालयातील दोन वकील झाले प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी.....न्यायाधिश होण्याचे स्वप्न बाळगून अभ्यास!

पनवेल - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग या परीक्षेचे निकाल नुकताच जाहीर झाला.पनवेलच्या न्यायालयात वकील म्हणून काम केलेल्या दोन तरूण वकिलांनी परिक्षेत यश मिळविले आहे.अँड.वंदना अरविंद चामले आणि अँड.ऋषिकेश पाटील अशी या दोघांची नावे आहेत.पनवेलमधील वकील अरविंद चामले यांची कन्या वंदना चामले हिने संपूर्ण महाराष्ट्रात नववा क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळवले आहे.
२०२२ साली ११४ जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पदासाठी परिक्षा घेण्यात आली. राज्यातून तब्बल १० हजार प्रथम परीक्षा दिली होती.त्यातून १२०० विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ठरले. जानेवारी २०२५ मध्ये ३४१ विदयार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली.यामधून ११४ विद्यार्थ्यांची न्यायधीश म्हणून निवड झाली.यामध्ये ९ व्या क्रमांकाने वंदना चामले यांनी यश मिळविले आहे.जेष्ठ वकील गणेश शिरसाठ यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले तर परीक्षेत मिळालेल्या यशाचे श्रेय तीने आई वडील आणि बहीणीला दिले आहे.वंदना चामले यांचे शिक्षण बालपण पनवेलमध्ये गेले आहे. नवीन पनवेलच्या सेंट जोसेफ शाळेत शिक्षण तर महात्मा कॉलेजमध्ये १२ वीचे शिक्षण झालेले आहे.खांदा कॉलनीतील बी.सी.ठाकूर विधी महाविद्यालयात वकीलीचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी अँड. ऋषिकेश पाटील हा देखील परिक्षेत ५२ व्या क्रमांकाने यशस्वी झाला आहे. २०१० साली सुरू झालेल्या विधी महाविद्यालयातून न्यायाधिश होणार हा पहिला विद्यार्थी ठरला आहे.ऋषिकेश पाटीलचे चुलते अँड.आर.के.पाटील पनवेलमधील वकील असून त्यांनी देखील अँड.गणेश शिरसाठ सरांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेचा अभ्यास केला. २५ व्या वर्षी न्यायाधिश झालेल्या ऋषिकेशने फक्त एक वर्षे पनवेलमध्ये वकीली केली.परंतु वकिलीचे शिक्षण घेतानाच न्यायाधिश होण्याचे स्वप्न बाळगून अभ्यास केला.दुसऱ्याच प्रयत्नात त्याने परिक्षा उत्तीर्ण केले.जळगावमधील पाचोरा तालुक्यात मुळगाव असलेल्या ऋषिकेशची गावात घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली.जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी या यशाबद्दल ऋषिकेशचे अभिनंदन केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment