खांदेश्वर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे जवळपास ७ लाख रुपये किंमतीचे ४० मोबाईल हस्तगत करून केले वाटप
पनवेल (संजय कदम): खांदेश्वर पोलीसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे विविध राज्यातून हस्तगत केले ७ लाख ५ हजार रुपये किमतीचे ४० मोबाईल हस्तगत केले असून हे मोबाईल फोन त्यांच्या मालकांना आज (दि.०३) सुपूर्द करण्यात आले आहेत.
नवी मुंबई आयुक्तालया अंर्तगत अत्याधुनिक तपास यंत्रणेचा वापर करून मोबाईल चोरीचा सामना करण्यासाठी तसेच गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता आणि मोबाईल सुरक्षा वाढविण्याकरीता प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. हरवलेलेमोबाईल फोन याबाबतची तक्रार नोंदविण्याकरीता नागरीकांना भारत सरकार द्वारे सीइआयआर पोर्टल सुरू करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील सन २०२५ मार्च पर्यतचे गहाळ झालेल्या मोबाईल पैकी एकूण ४० मोबाईल खांदेश्वर पोलीसांनी यशस्वीरित्या हस्तगत करून मुळ मालकांना हस्तांतरण केले आहेत. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे,अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२, पनवेल प्रशांत मोहीते, सहा. पोलीस आयुक्त पनवेल विभाग अशोक राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे. पोनि सचिन परदेशी यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे सपोनि शरद बरकडे, सपोनि प्रतापराव बंडगर, पोउपनिरीक्षक सुनील साळुंखे, पोहवा महेश कांबळे, पोहवा उदय देसाई, पोहवा भाऊराव बाचकर, पोहवा धीरेंद्र पाटील, पोहवा अमित पाटील, पोना मुबारक तडवी, ऋषीकांत परदेशी, सचिन सरगर, युवराज शिवगुंडे, सचिन पवार, संदिप तस्टे वैभव शिंदे, प्रविण पाटील यांनी विविध जिल्ह्यातून व राज्यातुन आतापर्यंत ७ लाख ५ हजार रूपये किंमतीचे एकुण ४० मोबाईल हस्तगत केले आहेत. तरी सदरचे हस्तगत मोबाईल फोन आज मोबाईलचे मूळ मालकांना पोलीस ठाणे येथे बोलावुन त्यांचे मोबाईल वरिष्ठांच्या हस्ते सन्मानपुर्वक परत करण्यात आलेले आहे. मोबाईल फोन परत मिळालेल्या नागरीकांनी जनमानसातील पोलीसांची प्रतिमा उंचावल्याबाबत पोलीस ठाणे कडील सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचे विशेष करून सचिन सरगर,सचिन पवार यांचे आभार मानून कौतुक केले आहे.
Post a Comment