News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलच्या बारवई,ठोंबरेवाडी,पोयंजे परिसरात दिसला रानगवा .... नागरिकांनी जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, हल्ला होण्याची शक्यता ... वन विभागाचे आवाहन

पनवेलच्या बारवई,ठोंबरेवाडी,पोयंजे परिसरात दिसला रानगवा .... नागरिकांनी जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, हल्ला होण्याची शक्यता ... वन विभागाचे आवाहन

पनवेल - पनवेल तालुक्यातील बारवई,ठोंबरेवाडी,पोयंजे या परिसरामध्ये रानगवा वन्यप्राणी फिरत असताना दिसला आहे.

तरी या भागातील नागरिकांनी हा वन्य प्राणी दिसल्यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.हा प्राणी दिसल्यास त्याला त्रास न देता फक्त त्यावर लांबून लक्ष ठेवावे, त्वरित वन खात्याला माहिती द्यावी, जेणेकरून त्या प्राण्यामुळे कोणालाही इजा होणार नाही.सदरील वन्य प्राणी हा अत्यंत संवेदनशील असून त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला असल्यास त्याच्याकडून हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर प्राण्याच्या गळ्यात एक दोर अडकला असून त्याद्वारे त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नये, असे वन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

वन कर्मचारी,श्री.राम तागड
9049185534

 अभिजीत विठोबा घरत 
( प्राणी मित्र ) 9168043683

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment