News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सेवेची हमी देण्यास पनवेल महापालिका अग्रेसर -आमदार प्रशांत ठाकूर .... पनवेल महानगरपालिकेच्या रोजगार मेळाव्यास उमेदवारांचा प्रतिसाद... नागरिकांच्या विविध सुविधांसाठी महानगरपालिकेचे पनवेल कनेक्ट ॲप

सेवेची हमी देण्यास पनवेल महापालिका अग्रेसर -आमदार प्रशांत ठाकूर .... पनवेल महानगरपालिकेच्या रोजगार मेळाव्यास उमेदवारांचा प्रतिसाद... नागरिकांच्या विविध सुविधांसाठी महानगरपालिकेचे पनवेल कनेक्ट ॲप

पनवेल  : एक शहर एक ॲप ‘पनवेल कनेक्ट’ ॲपच्या माध्यमातून पनवेल महापालिका नागरिकांना विविध सुविधा ऑनलाईन देत आहे.आयुक्तांनी हे ॲप नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले,सेवेची हमी देण्याच्या दृष्टीने महापालिकाने अग्रेसर राहून,उत्तम पाऊल उचलले,सेवा केंद्रे उभारली,या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून मनपा कार्यक्षेत्रातील प्रत्येकला पालिका ही आपली वाटली पाहिजे यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे,याबद्दल महापालिकेचे व आयुक्तांचे अभिनंदन,असल्याचे गौरवोद्वगार आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे काढले.
पनवेल महापालिकेच्यावतीने लोकनेते दि.बा.पाटील विद्यालयामध्ये आज पनवेल कनेक्ट ॲप,स्वच्छता विभागाकडील गाड्यांचे लोकार्पण,माहिती प्रसारण डिजीटल बोर्डचे अनावरण सोहळा ,महा-ई सेवा हमी केंद्राचे उद्घाटन तसेच भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.यावेळी आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे,माजी सभागृह नेते परेश ठाकूर,माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,माजी नगरसेवक व माजी नगरसेविका,शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे,भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी,माजी नगरसेवक नितीन पाटील,अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे,उपायुक्त सर्वश्री कैलास गावडे,डॉ.वैभव विधाते,प्रसेनजित कारलेकर,उपायुक्त श्रीमती मंगला माळवे,उपायुक्त स्वरूप खारगे,मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे,सहाय्यक आयुक्त डॉ.रूपाली माने,सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार,मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, सर्व विभाग प्रमुख ,अधिकारी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना आयुक्त मंगेश चितळे यांनी पारदर्शक , लोकाभिमुख,गतिमान प्रशासन करण्याच्या अनुषंगाने महापालिका प्रयत्न करत आहे,असे सांगितले.याचबरोबर सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने  तसेच ई गव्हनर्सच्या दृष्टीने मनपाने महत्वाचे पाऊल टाकले आहे.यासाठी महापालिकेने महा ई सेवा केंद्र सुरू केली आहेत तसेच नागरिकांच्या प्रत्येक अर्जाची दखल घेऊन त्यावर ताबडतोब उपाययोजना करण्याच्यादृष्टीने महापालिकेने पनवेल कनेक्ट ॲप लॉन्च केले आहे.या ॲपच्या माध्यमातून नागरिक व मनपा यांच्यामध्ये सुसंवाद साधला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रोजगार  मेळाव्यासाठी आलेल्या उमेदवारांनी अत्यंत विश्वासाने व धैर्याने मुलाखतीस सामोरे जाऊन नोकरी मिळवावी असा सल्ला व शुभेच्छा  यावेळी त्यांनी दिल्या.

शासनाने दिलेल्या 100 दिवसीय कृती आराखड्यांतर्गत सात कलमी कार्यक्रमांवर आधारित विविध योजनांचे आजच्या कार्यक्रमांत उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास गावडे यांनी केले.प्रास्ताविकातून त्यांनी होत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर  माहिती दिली.तर आभार प्रदर्शन अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान  करण्यात आला.निषकेन फाऊंडेशनचे किरण रहाणे, दीपक पवार व अमोल उंडे यांच्या सहकार्यातून महापालिकेने या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.


पनवेल कनेक्ट अॅप ....
पनवेल कनेक्ट अॅप हा एक मोबाइल अॅप्लिकेशन आहे. हे ॲप मुख्यतः पनवेल शहरातील रहिवाशांसाठी डिझाइन केलेले आहे,पनवेल कनेक्ट अॅप रहिवाशांमध्ये महानगरपालिका प्रशासनाशी संवाद सुलभ करते.
या ॲपच्या माध्यमातून पनवेल शहरातील रहिवाशांसाठी संवाद,सेवा विनंती आणि विविध कार्ये सुलभ करण्यात येणार आहे.हे अॅप प्रामुख्याने नागरीकांना सेवा देण्यासाठी तसेच, बिल भरणे,स्थानिक बातम्या आणि नागरी इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी वापरला जातो. आपत्कालीन सेवा: अॅप आपत्कालीन सेवा जसे की अग्निशामक, पोलिस, किंवा ऍम्ब्युलन्ससाठी यासाठीही देखील हे ॲप उपयुक्त ठरणार आहे.या ॲपचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.


स्वच्छता विभागाकडील गाड्यांचे लोकार्पण
पनवेल महानगरपालिकेने घनकचरा संकलन व वाहतूक प्रक्रियेसाठी अत्याधुनिक रिफ्युज कॉम्पॅक्टर 16 वाहनांची खरेदी केली आहे.या वाहनांचा उपयोग महापालिका हद्दीतील घनकचरा संकलन  करून घोट येथील क्षेपणभूमीवर वाहतूक करण्याकरिता होणार आहे.पशु संवर्धनासाठी दोन फिरत्या प्राण्यांच्या दवाखान्याचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.या गाड्यांचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


नागरिकांना महापालिकेच्या विविध उपाय योजनांची माहिती व्हावी यासाठी माहिती प्रसारण डिजीटल बोर्ड बसविण्यात येणार आहेत याचेही अनावरण या कार्यक्रमात करण्यात आले. या बरोबरच विविध सेवा देण्याच्या दृष्टीने महापालिका कार्यक्षेत्रात चार महा-ई सेवा हमी केंद्रे सुरू करण्यात येणार आहे,याचेही उद्घाटनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांना मिळणाऱ्या प्रशासकिय सोयी सुविधा अधिक पारदर्शक , प्रभावी आणि जबाबदार बनविण्यसाठी महापालिकेने ई- ऑफिस प्रणाली सुरू केली आहे.याचेही उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


भव्य रोजगार मेळावा
 1.एकूण ऑनलाईन नोंदणी       -: 3 हजार 551
 2.झालेल्या मुलाखती              -: 1 हजार 736
 3.निवड झालेले उमेदवार                  -:  872
4.दुसऱ्या फेरीसाठी निवड झालेले उमेदवार  -: 205
5. तांत्रिक प्रशिक्षणासाठी निवड उमेदवार    -: 614
6. दिव्यांग निवड झालेले उमेदवार            -: 2
7. नियुक्ती दिलेले उमेदवार                  -: 213
8. सर्वाधिक पॅकेज प्रतिवर्ष    -:  2लाख 40 हजार दर प्रतिवर्षी पॅकेज मिळाले

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment