News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पनवेलमध्ये सलग १८ तास अभ्यास उपक्रम

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पनवेलमध्ये सलग १८ तास अभ्यास उपक्रम

पनवेल - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये सलग १८ तास अभ्यास करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये विद्यार्थी अभ्यासिकेतील विविध विषयांच्या अभ्यासाकरीता,विशेषता केंद्रीय लोकसेवा आयोग,महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या अभ्यासाकरता येणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला.सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत सलग असा हा अभ्यास करण्यात आला

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम आयोजित करण्यासंदर्भात नुकतीच बैठक झाली.या बैठकीत माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी सदर १८ तास अभ्यासिकेची संकल्पना मांडली,त्यानुसार हा उपक्रम राबविला गेला.अशा उपक्रमांस पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांचे नेहमीच सहकार्य असते.या अभ्यासिका उपक्रमात ५० विद्यार्थी सहभागी झाले होते,गेली दहा ते बारा वर्षे हा उपक्रम राबविला जात असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाचे व्यवस्थापक प्रकाश गायकवाड यांनी ही माहिती दिली

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment