News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

दारूमुक्त खारघरसाठी शेकाप-भाजप एकत्र ....संघर्ष समितीच्या बैठकीला हजेरी ... लढा पुन्हा सक्रिय करण्याचा निर्धार

दारूमुक्त खारघरसाठी शेकाप-भाजप एकत्र ....संघर्ष समितीच्या बैठकीला हजेरी ... लढा पुन्हा सक्रिय करण्याचा निर्धार

पनवेल:खारघर शहराला दारूमुक्त करण्यासाठी मागील दोन दशकांपासून नो लिकर झोन खारघर हि मोहीम संघर्ष समितीच्या माध्यमातुन राबविली जात आहे.याकरिता अनेक आंदोलने मोर्चे निघाले.आजही हा लढा सुरु असून खारघर शहरात पार पडलेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत शेकापचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील आणि भाजप नेते,म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांनी एकत्र बैठकीत हजेरी लावत,या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला.

खारघर शहरात नव्याने एका बारला दारूविक्रीचा परवाना देऊ केल्याने शहरात दारूमुक्त खारघरचा लढा पुन्हा पेटला आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी खारघर शहरात नागरिकांच्या मागणीवरून दारूमुक्त खारघरचा दर्जा देण्याची विनंती केली.यावेळी पाटील यांनी खारघर शहरातील या आंदोलनाची पार्श्वभूमी देखील सभागृहात सांगितली.संघर्ष समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा सर्व मोर्च्यावर लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.या बैठकीला संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय जाधव यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीत भाजप आणि शेकाप नेते एकत्र आलेले पहावयास मिळाले.पनवेल मध्ये भाजप आणि शेकाप एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात.त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आल्याने दारूबंदीचा लढा निश्चितच बळकट होईल असा विश्वास संघर्ष समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

सर्वप्रथम खारघर ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव घेतला होता.त्यानंतर याबाबत निवडणुका पार पडल्या.या निवडणुका वादात सापडल्याने पुन्हा फेरनिवडणुका होऊन खारघर ची दारूबंदी उठली.मात्र त्यानंतर 15 वर्ष शहरात नव्याने दारूविक्रीचा परवाना देण्यात आला नव्हता.दोन वर्षांपूर्वी शहरात दोन नव्या बारना दारूविक्रीचा परवाना देण्यात आल्याने उत्पादन शुल्क विभागावर नागरिकांची नाराजी आहे.भविष्यात शहरात आणखी बारना हा परवाना बहाल करण्याची शक्यता असल्याने शहरात पून्हा आंदोलन पेटणार आहे.


प्रकाश आमटेंचा पाठिंबा  ......
खारघर शहरातील नो लिकर झोनसाठी पुकारलेल्या आंदोलनात आजवर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे.नुकतेच संघर्ष समितीचे सदस्य डॉ. वैभव भदाणे यांनी प्रकाश आमटे यांची भेट घेत त्यांना या आंदोलनाबाबत माहिती दिली असता त्यांनी आपला पाठिंबा या आंदोलनाला दर्शवला.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment