News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या पुरस्काराने पत्रकार संजय कदम सन्मानित..शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार ... मान्यवरांची उपस्थिती

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या पुरस्काराने पत्रकार संजय कदम सन्मानित..शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार ... मान्यवरांची उपस्थिती

पनवेल (वार्ताहर) - : पनवेल तालुका प्रेस क्लबचे सदस्य व रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांच्या 30 वर्षाच्या पत्रकारीता आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्यावतीने  व्यवसाय सेवा पुरस्कार आणि शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पनवेल शहरातील सिंधी पंचायत सभागृह येथे हा सोहळा संपन्न झाला.रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे दरवर्षी व्यवसाय करतानाच समाजासाठी काम करणार्‍या एखाद्या सेवाभावी व्यक्तीला व्यावसायिक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येत असते. 

पनवेल तालुका प्रेस क्लबचे सदस्य व रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांच्या 30 वर्षाच्या पत्रकारीता आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत रोटरी 3131 चे जिल्हा गव्हर्नर शीतल शाह यांच्या हस्ते व्यवसाय सेवा पुरस्कार आणि शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार ने त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी रोटरी जिल्हा प्रथम महिला रागिणी शाह, सहाय्यक गव्हर्नर डॉ. किरण कल्याणकर, पीडीजी डॉ. गिरीश गुणे, अध्यक्ष शैलेश पोटे, सचिव दीपक गडगे, रोटेरियन आणि अनस, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल सदस्य उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment