News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारणीत पनवेल महानगरपालिका अग्रेसर .... केंद्र शासनाने केले कौतुक

नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारणीत पनवेल महानगरपालिका अग्रेसर .... केंद्र शासनाने केले कौतुक

पनवेल : -  राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारणीत दिलेले उदिष्ट १०० टक्के साध्य करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्र शासनाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त अमगोथू श्री.रंगा नायक यांनी पत्राद्वारे महापालिकेचे कौतुक केले आहे.

नागरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या गृहनिर्माण संस्था तसेच झोपडपट्टी सदृश भागात आरोग्य सेवांपासून वंचित असलेल्या क्षेत्रात प्राथमिक आरोग्य संस्थांना सक्षम करण्यासाठी तसेच सातत्यपूर्ण आरोग्य गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी,राष्ट्रीय नागरी अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतात.याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करून आरोग्य निर्देशांक वाढविण्याकरीता केंद्र शासनाकडून १५ वा वित्त आयोग अंतर्गत राज्य स्तरावर एकूण २ हजार २३२ नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर मंजूर करण्यात आलेली आहेत.  

या अंतर्गत पनवेल महानगरपालीकेस ९ इतकी नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर मंजूर करण्यात आलेली आहे. त्या पैकी सर्व आयुष्मान आरोग्य मंदिर आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त डॉ.वैभव विधाते व मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित करून महापालिकेने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे.१५ व वित्त आयोगाचा विहित कालावधी पूर्ण होण्या पूर्वीच महापालिकेने निश्चित करून दिलेले उदिष्ट १०० टक्के पूर्ण केले हि अतिशय उलेखनीय व स्पृहणीय बाब असल्याचे केंद्र शासनाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

हे उदिष्ट पूर्ण करताना जागा निश्चित करणे,मनुष्यबळ भरती अशा  विविध स्तरांवर येणाऱ्या अडचणीवर मात करून महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्राचे १०० टक्के उदिष्ट साध्य केले आहे.यातून महापालिकेचा आरोग्याप्रती असलेला सकारात्मक दृष्टीकोन दिसून येतो.या उदिष्टपूर्तीबद्दल केंद्र शासनाने पत्राच्या माध्यमातून महापालिकेचे कौतुक केले आहे.तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली आहे.शहरी भागामध्ये अश्या प्रकारे नव्याने आरोग्य संस्था सुरु करण्यामध्ये येणारी आव्हाने व अडचणी यावर मात करून आपण एक चांगले उदाहरण प्रस्थापित केले असल्याचे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

या सर्वोत्तम कामगिरीबद्दल आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये वैद्यकीय आरोग्य विभागाचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी विशेष अभिनंदन केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment