नानोशी जवळील गोळीबार प्रकरण....गोळी झाडून खून करणार्या आरोपीस अटक ... पनवेल शहर पोलिसांची कामगिरी
पनवेल (संजय कदम) ः पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावाजवळील मोकळ्या जागेमध्ये नवीन घराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन एकास बंदुकीची गोळी मारुन त्याचा खुन केला होता.याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे.
गराडा गावाजवळील मोकळ्या जागेमध्ये नवीन घराचे बांधकाम चालु असलेल्या ठिकाणी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने बाबुराव वाघमारे, वय अंदाजे 47 वर्षे यांना बंदुकीने गोळी मारुन त्यांचा खून केला आहे. म्हणून पनवेल शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपआयुक्त, परिमंडळ 02, पनवेल यांच्या मार्गदर्शनाखाली व सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांचे पर्यवेक्षणाखाली 05 वेगवेगळे पोलीस पथके तयार करुन गुन्हयातील आरोपीचा शोध चालु केला.सदर गुन्हयात पथकांनी घटनास्थळी आजु बाजुच्या परिसरात वास्तव्यास असणारे लोकांकडे गुन्हयाचे अनुषंगाने बारकाईने चौकशी केली असता मयताचा खुन प्रभाकर उर्फ चिल्या याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपास चालु असताना पोलीस मुख्यालातील नियुक्तीचे पोलीस हवालदार दिपक कदम यांच्याकडून पनवेल शहर पोलीस ठाणे कडील सपोउपनि मंगेश कदम यांना तसेच बातमीदाराकडून पनवेल शहर पोलीस ठाणे कडील पोहवा म्हात्रे यांना आरोपी हा खालापूर येथील अदिवासी वाडीवर लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास पथक खालापूर येथे रवाना करण्यात आले. सदर ठिकाणी स्थानिक पोलीस अंमलदारांच्या मदतीने कोणतीही तांत्रिक माहिती नसताना आरोपी प्रभाकर जनार्दन वाघे उर्फ चिल्या, (वय 27 वर्षे) यास ताब्यात घेवून अटक करण्यात आली. सदर आरोपीने गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली सदर आरोपीचे गुन्हयातील साक्षीदार सोबत चालू असलेले भांडणात मयत बाबुराव वाघमारे हे भांडण सोडविण्यास गेले असताना त्याचा राग येवून आरोपीने बंदुकीची गोळी झाडून मयतास जिवे ठार मारल्याचे आतापर्यंताचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक आरोपीस मा. प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता आरोपीला दि. 03/04/2025 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर झाली असून गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे करित आहेत.
सदरची कार्यवाही नवी मुंबई आयुक्तलयातील पोलीस आयुक्त मिलीद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ 02) प्रशांत मोहिते, सहा. पोलीस आयुक्त (पनवेल विभाग) अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकीर पटेल यांच्या आदेशोन्वये पनवेल शहर पोलीस ठाणे कडील सपोनि प्रकाश पवार, पोउपनि विनोद लभडे, पोउपनि हर्षल राजपूत (पनवेल तालुका पो. ठाणे), स.पोउपनि मंगेश कदम, पोहवा दिपक कदम (पोलीस मुख्यालय, नवी मुंबई), पोहवा यशवंत झाझम, अविनाश गंथडे, नितीन वाघमारे, महेश पाटील, अमोल होईफोडे, परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, अमोल पाटील, संदेश म्हात्रे, पोना मिथुन भोसले, पोशि विशाल दुधे, चंद्रशेखर चौधरी व किरण कराड यांनी केली आहे.
Post a Comment