नवीन पनवेलमध्ये साहित्याची आनंद वारी ...साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल - कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व श्री.बापूसाहेब डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन,नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत कवितेचा जागर, गुढीपाडव्याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी दिलेल्या पुस्तकांची ज्ञानरूपी गुढी उभारण्यात येणार असून या ज्ञानरूपी गुढीचे मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात येणार आहे,त्याचप्रमाणे सावित्रीच्या लेकी कार्यक्रमांतर्गत कर्तुत्ववान महिला,महिला बचत गट यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.हा कार्यक्रम शनिवार दि.२९ मार्च २०२५,सकाळी ११ वाजता,श्री.बापूसाहेब डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन,नवीन पनवेल येथे होणार आहे.
या कार्यक्रमासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता किर,आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष धनराजजी विसपुते,कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील,रायगड जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुधीर शेठ उपस्थित राहणार असल्याची माहिती कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी सांगितले.
Post a Comment