भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांनी घडविले महिलांना कार्ला दर्शन
पनवेल (वार्ताहर) - : भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत आणि केदार भगत मित्र परिवार यांनी पनवेल शहरातील प्रभाग 19 मधील महिलांना मोफत कार्ला दर्शन घडवले.यावेळी शेकडो महिलांनी केदार भगत यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आशिर्वाद मिळण्याचे साकडे एकविरा चरणी घातले.
पनवेल शहरातील प्रभाग 19 मधील शेकडो महिलांना रविवार दिनांक 23 मार्च रोजी कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी व एक दिवसीय सहलीसाठी नेण्यात आले. शहरातील गावदेवी मंदिरा समोरुन सहलीच्या बसेसला आमदार प्रशांत ठाकूर व जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सोडण्यात आले.या सहलीत महिलांसाठी हळदीकूंकू, संगीत खुर्ची व उखाणे असे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करुन विजेत्यांना बक्षीस देण्यात आले तसेच डीजेच्या तालवर नृत्य करण्याचा आनंद देखील महिलांनी घेतला. महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीत्वाला सलाम आणि मातृत्वाला वंदन करुन ही सहल आयोजित करण्यात आली होती.यावेळी माजी नगरसेविका दर्शना भोईर,विशाल सावंत,प्रशांत शेटये,सचिन भगत, अभिजीत साखरे आदि उपस्थित होतेे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी केदार भगत व त्यांच्या मित्र परिवाराने विशेष मेहनत घेतली.
Post a Comment