News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगर हद्दीमध्ये जीबीएस रुग्ण? उपचारासाठी प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांची पनवेल महानगरपालिकेकडे मागणी

पनवेल महानगर हद्दीमध्ये जीबीएस रुग्ण? उपचारासाठी प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांची पनवेल महानगरपालिकेकडे मागणी

पनवेल (वार्ताहर) ः  पुणे आणि इतर शहराबरोबरच पनवेल महानगरपालिका क्षेत्रात जीबीएस रुग्ण आढळून येत आहेत. खाजगी रुग्णालयामध्ये ते उपचार घेत असून ते एक महागडे आणि खर्चिक आहे.सर्वसामान्यांच्या खिशाला ते परवडणारे नसून मनपा प्रशासनाने यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे.

गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजेच जीबीएस हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. एखादा विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे हा आजार होत असल्याचा अंदाज आहे. बहुतांश आजारात जर एखाद्या रोगाने हल्ला केला, तर आपली रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते. मात्र यात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते. जी बी एस या रोगाची लागण झाल्यानंतर  शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती आजूबाजूच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. यात नसांना प्रभावीपणे सिग्नल पाठवता येत नाहीत. तसेच मेंदूला सूचनांचं पालन करणंदेखील स्नायूंना शक्य होत नाही. तसेच इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात. याबाबत आपण ज्ञात आहातच.पनवेल परिसरामध्ये काही ठिकाणी अशा प्रकारचे रुग्ण आढळू लागले आहेत विशेषता कामोठे वसाहती जीबीएसची लागण झालेले रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत दक्ष राहण्याचे सुचित केलेले आहे.केंद्र व राज्य सरकारकडून ही मार्गदर्शक तत्व देण्यात आलेले आहेत. पुण्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. या व्यतिरिक्त तर ठिकाणीही अशा प्रकारचे रुग्ण आढळून येत आहेत.पनवेल महानगरपालिकेने संबंधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी त्यांना मोफत वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांनी आयुक्तांना दिले आहे.

जीबीएस या रोगावर उपचार अत्यंत खर्चिक असून औषध सुद्धा सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नाहीत.त्यानुसार पनवेल महानगरपालिकेकडून सर्वेक्षण करून संबंधित रुग्णांवर मोफत उपचार करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात यावी याबाबत जनजागृती आणि प्रबोधन सुद्धा व्हावे अशी विनंती मनपा आयुक्तांना केली आहे.याबाबत कार्यवाही न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून थेट पंतप्रधान कार्यालयाकडे पाठपुरावा केला जाईल.

सतिश मोहन पाटील,
जिल्हाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
पनवेल शहर जिल्हा

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment