पनवेलच्या जास्तीत जास्त विकासाठी कटिबद्ध - महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर ....तळोजा विभागात प्रचारार्थ रॅली,ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत
पनवेल (प्रतिनिधी) - राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देत जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारे आणि कार्यसम्राट लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांना ओळखले जाते.विश्वास आणि सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून त्यांचे कार्य नेहमीच उत्कृष्ट ठरले आहे,त्यामुळे पनवेल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय,पीआरपी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना जनतेचा उदंड प्रतिसाद पहायला मिळत आहे.
खुटारी,रोहिंजण,किरवली,धानसर,धरणा,धरणा कॅम्प, पिसार्वे,तुर्भे,करवले,तळोजे मजकूर,कोयनावेळे,घोट व पेंधर येथे प्रचारार्थ रॅली आली असता तेथील ग्रामस्थांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.या मतदार संघाचे सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून संपृर्ण जबाबदारीने आमदार प्रशांत ठाकूर कार्यरत आहेत. नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी खऱ्या अर्थाने पनवेलला विकासकामांची ओळख करून दिली.ती कायम विधायक काम करत त्यांनी कामाचा झपाटा कायम ठेवला.त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दूरदृष्टीतून पनवेल विधानसभा क्षेत्रात विकासाचे महापर्व निर्माण झाले.कार्य कौशल्यातून पनवेलचा विकास घडवणारे, वक्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्त्व गुणसंपन्न नेता व समाजप्रिय व्यक्तीमत्व म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांचा पनवेलकरांना नेहमीच अभिमान राहिला आहे. सर्व धर्म समभाव आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांच्याकडून कायम पहायला मिळते.नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करतानाच लोकांना अपेक्षित असलेला शहरासह ग्रामीण भागाचा विकास त्यांच्याकडून झाला आहे.पंधरा वर्षांपूर्वी ग्रामीण भागात विकास पहायला मिळत नव्हता.मात्र आमदार प्रशांत ठाकूर यांनी या विधानसभेचे नेतृत्व स्वीकारल्यापासून शहराबरोबरच ग्रामीण भागातही विकासकामांचा आलेख चढता राहिला आहे,त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ होत असलेल्या रॅलीला उदंड प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र या ठिकाणी पहायला मिळाले.
या रॅलीमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक नितीन पाटील,उपाध्यक्ष संजय पाटील,माजी नगरसेवक हरेश केणी,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख परेश पाटील,माजी नगरसेवक संतोष भोईर,भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, ज्येष्ठ कार्यकर्ते चाहुशेठ पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका कल्पनाताई ठाकूर,माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे,विनोद पाटील,संतोशबुवा पाटील,विनोद घरत,समीर कदम, प्रकाश खैरे, किरण पाटील, अशोक साळुंखे,लीना म्हात्रे, जयश्री म्हात्रे,हरिश्चंद्र म्हात्रे,रविकांत म्हात्रे,श्रीपाद पाटील, दिनेश पाटील,विश्वनाथ पाटील,वैजनाथ पाटील,सचिन पाटील,हरीशेठ पाटील,सुरेश पोरजी,जितेंद्र पोरीजी, नरेश पोरजी,काळूराम गोंधळी,प्रकाश पाटील ,दिलीप पाटील, संजय कदम,मनोहर कदम,शेखर कदम,वंदना कदम, राजेश महादे,भाविक महादे,संजय म्हात्रे,दिलीप पाटील, भास्कर तरे,नारायण बुवा, गोपीनाथ पाटील, वासुदेव मढवी, संतोष मढवी,रमेश मढवी,मदन पाटील,सरपंच गोपाळ पाटील,जगन पाटील, नितेश पाटील,वैभव भोईर,निहाल कदम,संतोष पाटील,ऋषाल पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास' या धेय्याप्रमाणे काम करीत असून पनवेलचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली.
Post a Comment