पनवेलच्या काँग्रेस भवनमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा .. पनवेल विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवत आहोत - उमेदवार बाळाराम पाटील .... पनवेलची महाविकास आघाडी बाळाराम पाटील यांच्यासोबतच - काँग्रेसचे सुदाम पाटील
पनवेल- पनवेल विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवत आहोत असे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील (शेकाप) यांनी पनवेलच्या काँग्रेस भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
यापुढे बोलताना बाळाराम पाटील म्हणाले,शेतकरी कामगार पक्षाला महाविकास आघाडीचा पाठिंबा याबाबत संभ्रम निर्माण केला जात होता परंतु आज काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,समाजवादी पार्टी,आम आदमी,सामाजिक संघटना यांच्या मेळाव्यातून महाविकास आघाडी एकसंध असल्याचे दाखवून दिले आहे.माझ्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे शरद पवार यांची सभा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,तशी चर्चा सुरू आहे असे बाळाराम पाटील यांनी सांगून पनवेलच्या हिताच्या दृष्टीने आघाडी म्हणून ही निवडणूक लढवत आहोत. शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार लीना गरड यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता, महाविकास आघाडीच्या भविष्याच्या वाटचालीवर परिणाम होणार नाही याची खबरदारी आम्ही घेत आहोत त्यामुळे मी शिवसेनेबद्दल काहीही बोलणार नाही असे सांगितले.पनवेलच्या स्तरावर स्थानिक प्रश्न म्हणून स्थानिक स्तरावरचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले.
पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील यांनी,पनवेलच्या महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचा आज मेळावा झाला,या मेळाव्यात पनवेलची महाविकास आघाडी बाळाराम पाटील यांच्या सोबतच असून त्यांच्या प्रचारार्थ तसेच त्यांना निवडून आणण्याचा निश्चय आम्ही महाविकास आघाडीने केला आहे.आजच्या मेळाव्याला महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते एका दिलाने उपस्थित होते असे सांगितले.या मेळाव्याला शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी विशेष करून उपस्थित होते,त्यांनी ही महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
Post a Comment