News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केली मतदान केंद्राची पाहणी .... अधिकारी,कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा,जिल्ह्यातील सात मतदारसंघामध्ये २४ लाख ८८ हजार ७८८ इतके मतदार

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केली मतदान केंद्राची पाहणी .... अधिकारी,कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा,जिल्ह्यातील सात मतदारसंघामध्ये २४ लाख ८८ हजार ७८८ इतके मतदार

रायगड (जिमाका),दि.19 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता जिल्ह्यातील सात मतदारसंघामध्ये 24 लाख 88 हजार 788 इतके मतदार असून एकूण 2 हजार 820 मतदान केंद्र असून या मतदान केंद्रावर बुधवार, दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7.00  ते सायं.6.00 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मतदानकेंद्राची पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला तसेच मतदान प्रक्रीयेसाठीचे साहित्य घेवून जाणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

निवडणूक मतदानासाठी यंत्रणा सज्ज असून प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प,उन्हाची स्थिती लक्षात घेता औषधे, पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या मतदान केंद्रावर बैठक व्यवस्था,उन्हाची झळ लक्षात घेता मंडप उभारणी आदी सुविधेसोबतच इतर तांत्रिक बाबींची पूर्तताही करण्यात आली आहे. 

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निःपक्ष, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार होईल, मतदारांनी  निर्भय होऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. 
०००००००

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment