लोकशाहीचा महाउत्सव ...पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये ५८.७० टक्के मतदान,रायगडमध्ये ६८.८० टक्के सरासरी मतदान
पनवेल- जिल्ह्यात सरासरी ६८.८० टक्के एवढे मतदान झाले,पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये ५८.७० सरासरी एवढे टक्के मतदान झाले.मतदारांनी उस्फूर्तपणे,निर्भीडपणे मतदान केले.सकाळपासूनच मतदानासाठी महिला-पुरुष मतदारांची गर्दी होती.
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय,पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर,त्यांच्या मातोश्री शकुंतला ठाकूर,पत्नी वर्षा ठाकूर,बंधू परेश ठाकूर,अर्चना ठाकूर,चिरंजीव अमोघ ठाकूर,त्याचबरोबरीने भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व त्यांच्या कुटुंबाने पनवेलमधील गुजराती शाळा मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.उरण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मतदानाचा हक्क गव्हाण कोपर या मतदान केंद्रावर बजावला.
गुजराती विद्यालय,पनवेल येथे उद्योजक,माजी आदर्श नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांनी मतदान करत ज्येष्ठ नागरिक यांच्या सोबत फोटो घेत त्यांचे कौतुक केले आणि लोकशाहीच्या मतदान रुपी उत्सवात सहभागी होत मतदान केले.कोपर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उरण विधानसभेचे महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रितम जे.एम.म्हात्रे यांनी मतदान केले.
Post a Comment