कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची जागतिक भरारी! .. इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF ) लंडन या जागतिक संघटनेच्या मुख्य कार्यकारणी मंडळ सदस्य म्हणून कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची निवड
पनवेल- इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF ) लंडन या जागतिक संघटनेच्या मुख्य कार्यकारणी मंडळ सदस्य म्हणून कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची निवड झाली आहे.
जगातील १६० देश सभासद असलेल्या इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF ) लंडन या बहुराष्ट्रीय संघटनेचे अधिवेशन मोरोको येथे सुरु आहे.या अधिवेशनात बहुराष्ट्रीय संघटनेच्या जागतिक कार्यकारिणीची निवडणूक पार पडली.या निवडणुकीत भारत देशातून कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची एक्सिक्युटीव्ह मेंबरपदी निवड करण्यात आली.जिथे भारतीयांना प्रतिनिधित मिळत नव्हते तिथे आपल्या नेतृत्व कौशल्याने कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी भारतीयांचा झेंडा रोवला त्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post a Comment