News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

एलएचएस ब्लॅक ऑइलने भरलेल्या टँकरला लागली आग .. पनवेलजवळील करंजाडे परिसरातील घटना

एलएचएस ब्लॅक ऑइलने भरलेल्या टँकरला लागली आग .. पनवेलजवळील करंजाडे परिसरातील घटना

पनवेल (संजय कदम)-  ः एलएचएस ब्लॅक ऑइलने भरलेल्या टँकरला अचानकपणे आग लागल्याची घटना पनवेलजवळील करंजाडे परिसरात आज सकाळी घडली आहे.


टँकर क्र एमएच/15/ईजी/7634 यामध्ये इंडियन ऑइल धुतुम येथे सदर टँकर मध्ये एलएचएस ब्लॅक ऑइल (18000 लिटर) भरून जेएनपीटी हायवे रोडने  खोपोली येथे जात असताना करंजाडे याठिकाणी सकाळी 11:30 वा चे सुमारास आला असता सदर टँकर ला ड्राइव्हरच्या पायाखालून आग लागली. सदर घटनेची पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील पनवेल वाहतूक शाखा तसेच पोहवा योगेश भोईर,पोलीस अंमलदार रुपेश ठाकूर,निलेश ठाकूर, विनोद घोडे,निकम,प्रकाश भोरे यांना मिळताच त्यांनी सदर घटनास्थळी जाऊन फायर ब्रिगेड महानगरपालिका व ओएनजीसी याना दिली घटनास्थळी महानगरपालिका  फायर ब्रिगेड आल्यानंतर सदर टँकरची आग विजविण्यात येत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेल वाहतूक शाखेचे वपोनि संजय पाटील यांनी पीटर मोबाईल मधून फायर एक्सटेंशन काढून आग विझवली तसेच थोड्या वेळात सिडको फायर ब्रिगेड आल्यानंतर पूर्णपणे आग विजवली आहे.सदर आगीमध्ये टँकरचे केबिन चे नुकसान झाले आहे सदर टँकर चालकाचे नाव राम कपिल फलटण चौधरी वय 58 वर्षे रा वडाळा मुंबई असे आहे सदर आगीमुळे कोणतेही जीवितहानी झालेली नाही.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment