कार्यकर्त्यांच्या मनातील भावी आमदाराचे स्वप्न पूर्ण ...राज्याच्या भाजपाचे सरचिटणीस,पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांनी घेतली आमदारकीची शपथ
मुंबई- मुंबई येथे विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला,त्यामध्ये राज्याच्या भाजपाचे सरचिटणीस,पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांनी आज आपल्या आमदारकीची शपथ घेतली.
भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस श्री.विक्रांत पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याबद्दल भावी आमदार असे बॅनर सोशल मीडियावर टाकले होते,यामध्ये विक्रांत पाटील यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.आज विक्रांत पाटील यांच्या रूपाने कार्यकर्त्यांच्या मनातील भावी आमदाराचे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Post a Comment