महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा ...२० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात मतदान,२३ नोव्हेंबरला मतमोजणी (निकाल)
पनवेल- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून ही निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे,तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी (निकाल) होणार आहे.महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे.२३ ते २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.४ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल.महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्र असून ९ कोटी ६३ लाख मतदार आहेत.
Post a Comment