रस्त्यामधील खड्ड्यांवर वृक्षारोपण ; शेकापचे आंदोलन
पनवेल (वार्ताहर) ः १५ ऑक्टोबरपर्यंत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खड्डे बुजवा,अन्यथा त्यामध्ये वृक्षारोपण करून आंदोलन केले जाईल असा इशारा पनवेल शहर जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिला होता,मात्र भूमिपूजनाच्या व्यस्त कार्यक्रमात असलेल्या मनपाने याकडे दुर्लक्ष केले.त्यामुळे शेकापने आक्रमक भूमिका घेत खड्ड्यांमध्ये झाडे लावून प्रतिकात्मक आंदोलन केले.खांदा वसाहत,नवीन पनवेल,कामोठे खारघर,तळोजा येथील खड्ड्यांची समस्या अधिक जटिल बनत चालली आहे.ऑक्टोबर महिना अर्धा संपला असतानाही रस्त्यांच्या दुरुस्तीकडे पनवेल महापालिकेने दुर्लक्ष केले आहे.फक्त ठराविक ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरणाचा टेंभा मिरवला जात आहे.मात्र प्रत्यक्षात ज्या ठिकाणी सातत्याने रस्त्यांवर खड्डे पडतात तसेच रहदारी असणार्या रोडचे सिमेंटीकरण करण्यात पनवेल महापालिका धन्यता मानत नसल्याचे दिसून येत आहे. खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केला जात आहे. पूर्वी सिडको आणि आता मनपाची ही मालिका सुरू आहे. सर्वसामान्यांचे पैसे खड्ड्यात घातले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. दरम्यान या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे आक्रमक झाले.त्यांनी मनपा आयुक्त मंगेश चितळे यांना पत्र देऊन या रस्त्यांचे डागडुजी 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी अन्यथा त्याच दिवशी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रतिकात्मक आंदोलन केले जाईल असा इशारा लेखी स्वरूपामध्ये इशारा देण्यात आला होता परंतु आचारसंहितेच्या अगोदर फक्त भूमिपूजनामध्ये व्यस्त असणार्या मनपाने याकडे दुर्लक्ष केले आहे.पनवेल महापालिका विकास कामांसाठी कोट्यावधीचे उड्डाणे अशा प्रकारची जाहिरात करत आहे. ऑनलाइन लोकार्पण आणि भूमिपूजनाचा सपाटा लावला जात आहे. मात्र रस्त्यावरील खड्डे महापालिकेला दिसत नसल्याने मंगळवारी शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. खड्ड्यात वेगळ्या वृक्षांचे रोपण यावेळी करण्यात आलेच. त्याचबरोबर त्या ठिकाणी बसून आंदोलनकर्त्यांनी चटणी भाकरीवर ताव मारला माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांचासह यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.
भूमिपूजनाचा गाजावाजा रस्त्यांचा वाजला बँडबाजा!
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात विकास कामे दाखवण्याचा उद्देशाने धावपळ सुरू आहे. एकीकडे रस्ते खड्ड्यात गेले असताना दुसरीकडे असा विकासाचा दिखावा केला जात असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाकडून करण्यात आला आहे.पुरे झाला भूमिपूजनाचा गाजावाजायेथे पनवेलच्या रस्त्याचा वाजलाय बँडबाजा अशा घोषणा देऊन शेकाप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी आंदोलन केले.
पनवेल ही क्रीम पोस्टिंग असल्याने तेच अधिकारी आणि तेच सत्ताधारी अशा प्रकारची परिस्थिती गेल्या दशकांमध्ये पाहावयास मिळत आहे. मिली जुली भगत असणारे महापालिका प्रशासन अत्यंत अकार्यक्षम आहे. येथील रस्ते खड्ड्यात गेले असतानाही मनपाला काहीच पडले नाही. मुख्यमंत्र्यांचे हस्ते स्वतःचे सत्कार करून घेण्यात ते व्यस्त आहेत. आणि दिखाव्यासाठी वेगवेगळया भूमिपूजन कार्यक्रमाची मालिका सुरू आहे. मुदत देऊनही रस्त्यावरील खड्डे महापालिकेने बुजवले नाहीत. त्यमुळे आम्ही आंदोलन करून निषेध नोंदवला. त्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण सुद्धा केले.आता तरी महापालिकेला जाग येईल का असा आमचा सवाल आहे.
महादेव वाघमारे
कार्याध्यक्ष
शेतकरी कामगार पक्ष पनवेल शहर जिल्हा

Post a Comment