रायगड जिल्ह्यातून शेकापक्षाचे ४ उमेदवार जाहीर ...आम्ही आजही महाविकास आघाडी सोबत - शेकाप सरचिटणीस जयंत पाटील
पनवेल- रायगड जिल्ह्यातून शेकापक्षाचे ४ उमेदवार आज जाहीर करण्यात आले.अलिबाग येथे झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या जाहीर सभेत या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली, त्यामध्ये पनवेल विधानसभेसाठी बाळाराम पाटील उरण विधानसभेसाठी प्रीतम म्हात्रे अलिबाग विधानसभेसाठी चित्रलेखा पाटील तर पेण- सुधागड विधानसभेसाठी अतुल म्हात्रे हे उमेदवार जाहीर करण्यात आले.
आमचे उमेदवार जाहीर केले असले तरी आम्ही आजही महाविकास आघाडी सोबत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्याबरोबर आमचे बोलणे झाले आहे,त्यांनी शब्द दिला आहे,त्यामुळे आम्ही आजही आशावादी आहोत असे शेकापक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी बोलताना सांगितले,आम्ही आमदारकी खेचून आणू असा विश्वासही व्यक्त केला.
Post a Comment