पनवेल तालुक्यातील दुंदरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळांसाठी सिसिटीव्ही कॅमेरे,डस्टबीन वाटप तसेच सौरदिवे,सौरऊर्जा सेवांचा शुभारंभ
पनवेल :- पनवेल तालुक्यातील दुंदरे ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाषशेठ भोपी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत दुंदरे हद्दीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रायगड जिल्हा परिषद ४ शाळेला सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले तसेच आदिवासी वाड्या बौद्ध वाड्यांना स्वच्छता मोहिमेअंतर्गत डस्टबिनचे वाटप करण्यात आले तसेच सामुदायिक ठिकाणी स्मशानभूमी या ठिकाणी सौरदिवे लावण्यात आले,याचबरोबर एमएससीबी ऑफिसच्या अधिकाऱ्यांसोबत ग्रामपंचायतमध्ये बैठक घेऊन सौर ऊर्जा विषयी माहिती देण्यात आली.
यावेळी महावितरण कंपनीमध्ये कार्यरत अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री देवीदास बैकर,सहाय्यक अभियंता श्री रत्नाकर जाधव,कनिष्ठ अभियंता श्री विपुल भिंगारदिवे तसेच झायलोटेक या एजन्सीचे विकी सावंत यांच्या उपस्थितीत यांच्यासह सेवांचा शुभारंभ करण्यात आला,यावेळी ग्रामपंचायत सरपंच सुभाष गोपी उपसरपंच शितल कैलास भोपी आणि सदस्य महेश पाटील,सुप्रिया करमेलकर,विश्वास पाटील,शांताराम चौधरी आदी सदस्य व बाळासाहेब सरडे,इमरान काजी तसेच भारत सुभाष भोपी,दिलीप उलवेकर,रवींद्र शेळके,सुभाष नारायण भोपी,प्रकाश रामदास भोपी,प्रभाकर पाटील अनेक ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
Post a Comment