News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

इन्स्ट्राग्रामवर शाळकरी मुलीचे आश्‍लल फोटो ; बारावीमधील २ विद्यार्थ्यांविरुध्द गुन्हा ... बदनामीकारक माहिती प्रसिध्द केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी दाखल केला गुन्हा

इन्स्ट्राग्रामवर शाळकरी मुलीचे आश्‍लल फोटो ; बारावीमधील २ विद्यार्थ्यांविरुध्द गुन्हा ... बदनामीकारक माहिती प्रसिध्द केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी दाखल केला गुन्हा

पनवेल (वार्ताहर) ः पनवेल भागात राहणार्‍या आणि इयत्ता १२वीत शिक्षण घेत असलेल्या २ विद्यार्थ्यांनी एका १५ वर्षीय शाळकरी मुलीचे मॉर्फिंग करुन तयार केलेले आश्‍लल फोटो शाळेच्या इन्स्ट्राग्राम ग्रुपवर व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणी २ अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात आयटी अ‍ॅक्टसह पोक्सो तसेच बदनामीकारक माहिती प्रसिध्द केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणातील १५ वर्षीय शाळकरी पिडीत मुलगी पनवेल भागात रहाण्यास असून सध्या ती शिक्षण घेत आहे. 

पिडीत मुलीने काही महिन्यापुर्वी आपल्या नावाने इन्स्ट्राग्रामवर अकाऊंट सुरु केले होते.याच इन्स्टाग्राम अकाऊंटवरील या मुलीचे फोटो पनवेलच्या नेरेगावात राहणार्‍या आणि इयत्ता १२ वीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने चोरले.त्यांनतर त्याने मॉर्फिंग करुन पिडीत मुलीचे आश्‍लल फोटो तयार करुन ते शाळेच्या इन्स्टाग्राम ग्रुपवर व्हायरल केले.त्यानंतर पनवेलच्या करंजाडे भागात राहणार्‍या दुसर्‍या विद्यार्थ्याने देखील त्या मुलीचे मॉर्फ केलेले आश्‍लल फोटो सोशल मिडीयावरुन व्हायरल केले.दरम्यान,पिडीत मुलीचे व्हायरल झालेले आश्‍लल फोटो तिच्या मैत्रिणीच्या निदर्शनास आल्यानंतर तिने सदर मुलीला त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर पिडीत मुलीने व्हायरल झालेल्या फोटोचा शोध घेतला असता, नेरे गावातील तरुणाने तिचे फोटो चोरुन मॉर्फिंग करुन ते फोटो शाळेच्या इन्स्टाग्राम ग्रुपवर व्हायरल केल्याचे आढळून आले तसेच करंजाडे भागात राहणार्‍या दुसर्‍या विद्यार्थ्याने देखील तीचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल केल्याचे लक्षात आल्यानंतर सदर मुलीने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment