महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,पनवेलचा पार्थ माने ठरला जगज्जेता..चीन,अमेरिका या देशाच्या स्पर्धकांना मागे टाकत,जागतिक ज्युनिअर अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदक पटकावून केली चमकदार कामगिरी
पनवेल- रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,पनवेल येथे इयत्ता बारावी विज्ञान शाखेमध्ये शिकत असलेला पार्थ राकेश माने या विद्यार्थ्याने लिमा,पेरू या देशात पार पडलेल्या ज्यूनिअर वर्ल्ड चॅमियनशिप 2024-25 मध्ये 10 मीटर एअर रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारात अमेरिका व चीनला मागे टाकत दोन सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. दि.26 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबर 2024 दरम्यान आयोजित या जागतिक ज्युनिअर नेमबाजी स्पर्धेत दोन सुवर्णपदक प्राप्त करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
पार्थने पेरू या देशातून नुकताच भारतात परतल्यानंतर त्याने सुवर्णपदकासह महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट घेतली.यावेळी त्याचे भरभरून कौतुक करण्यात आले.“ज्यूनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत पार्थ माने यांनी चीन व अमेरिका या देशाच्या स्पर्धकांना मागे टाकत,भारताला सुवर्णपदक प्राप्त करून देणे हे जितके भूषणावह आहे तितकेच महात्मा फुले महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे”, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर साहेब यांनी केले.
यावेळी ज्युनिअर महाविद्यालयाच्या सायन्स विभागाच्या इन्चार्ज सौ.काटकर मॅडम, कला व वाणिज्य विभागाचे इन्चार्ज डॉ.विशे सर,वर्ग शिक्षिका सौ.नावडकर मॅडम,श्री.कथारे सर,सौ.वानखेडे मॅडम,सौ.हरवंदे मॅडम व क्रीडा शिक्षक अक्षय जितेकर सर यांनी देशाचे नाव उंचवणाऱ्या महाविद्यालयातील या आंतरराष्ट्रीय खेळाडूचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment