News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

३०२ कोटींच्या जम्बो विकास कामांचा भूमिपूजन,लोकार्पण सोहळा ...पनवेल महानगरपालिकेच्या या सोहळ्यास पालकमंत्री,मंत्री, खासदार,आमदार यांची उपस्थिती

३०२ कोटींच्या जम्बो विकास कामांचा भूमिपूजन,लोकार्पण सोहळा ...पनवेल महानगरपालिकेच्या या सोहळ्यास पालकमंत्री,मंत्री, खासदार,आमदार यांची उपस्थिती

पनवेल-  पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध जम्बो विकासकामांचे भूमिपूजन,लोकार्पण सोहळ्याचे दि.८ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे.पनवेल महानगरपालिकेच्या या सोहळ्यास पालकमंत्री,मंत्री, खासदार,आमदार उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यास राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री श्री.उदय सामंत,महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे,मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.श्रीरंग बारणे,पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.प्रशांत ठाकूर,शिक्षक कोकण मतदार संघाचे विधान परिषद सदस्य श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे,पदवीधर कोकण मतदारसंघाचे विधानसभा सदस्य श्री.निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे,या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन  आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी केले आहे. 

यावेळी पुढीलप्रमाणे भूमीपूजन समारंभ होणार आहेत-
विकास कामांचा लोकार्पण सोहळा .....
1) पनवेल महानगरपालिकेचे नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र (UHWC) ठिकाण - आसूडगांव व इतर ३ ठिकाणे.
2) मोबाईल मेडीकल युनिट्स (फिरता दवाखाना) - एकूण २ वाहने.
३) वळवली येथील पनवेल महानगरपालिकेची प्राथमिक शाळा.
4) अग्निशमन वाहन 22 MTRTTL 1 वाहन, ॲडव्हान्स्ड रेस्क्यू व्हेईकल 1 वाहन, ॲडव्हान्स्ड फायर इंजिन 1 वाहन
5) पमपा हद्दीमध्ये पर्यावरण जनजागृती निर्माण करण्यासाठी एकूण 1 वाहन
6) रामकि ग्रुप यांचे सीएसआर निधीतून बहुउद्देशीय सभागृह
7) पनवेल महानगरपालिकेचे लोकनेते स्वर्गीय दि.बा पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल
8) धुळीचे प्रदुषण नियंत्रण ठेवणेकरिता एकुण 4 वाहने
9) फिरते वातावरणीय हवा गुणवत्ता मापक केंद्र 1 वाहन

विकास कामांचे भूमीपूजन .....
 1) पनवेल महानगपालिका हद्दीमध्ये सुरक्षितेतच्या दृष्टीने एकूण 1343 अत्याधुनिक CCTV यंत्रणा कार्यन्वित करणे
 क्षमता असलेले हे वाहन फर्स्ट टर्नआऊट (Fire Respond) म्हणून वापरण्यात येणार आहे.
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत पनवेल महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी अ.भु.क्र.५०/९ येथे प्रस्तावित असलेल्या गृहप्रकल्प इमारतीचे व अनुषंगिक पायाभुत सुविधांचे बांधकाम करणे.
3) पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती क मधील लायन्स गार्डन ते तहसिल ऑफिस ते एचओसी कॉलनी पर्यंत रस्त्यांचे क्राँकीटीकरण करणे.
4) पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती अ प्रभाग क्र. ०१ कोयनावेळे व घोट या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील तळोजा नदीवरील पुल बांधकाम करणे.
5) पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर येथील सेक्टर १२ भुखंड क्रमांक १२ अ क्षेत्रफळ १४९१.०४ या ठिकाणी नव्याने दैनिक बाजार मच्छी मार्केट बांधकाम करणे.
6) बेघरांसाठी रात्र निवारा बांधकाम करणे - खांदा कॉलनी.
7) पनवेल महानगरपलिका हद्दीतील बल्लाळेश्वर मंदिर व रामेश्वर मंदिर येथे प्रवेशद्वार बांधणे व घाटाचे उन्नतीकरण करणे.
8) पमपा हद्दीतील आडिवली तलाव पुनरूज्जीवीत करणे.
9) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर मिनी थिएटर बांधकाम करणे.
10) पनेवल महानगरपालिका हद्दीतील अंतिम भूखंड क्रमांक ४१४ मध्ये प्ले ग्राऊंड खेळाचे मैदान केंद्र विकसित करणे.
11) पमपा हद्दीतील सिध्दी करवले तलाव पुनरूज्जीवीत करणे,या कामांचा समावेश आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment