News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी सरकार सकारात्मक -केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांची स्पष्ट भूमिका, लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती बरोबर दिल्ली येथे बैठक

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी सरकार सकारात्मक -केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांची स्पष्ट भूमिका, लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती बरोबर दिल्ली येथे बैठक

पनवेल- प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांच्या आणि आपल्या संघर्षामुळे नामकरण लढ्याने एक वेगळी उंची गाठली आहे,या संघर्षाचा आणि आंदोलनाचा सन्मान करीत सरकार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करीत, लवकरच नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटील यांचे नाव जाहीर करेल अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी आज नवी दिल्ली येथे जाहीर केली.केंद्रीय नागरी उड्डयान मंत्रालयाने नामकरण संदर्भात लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती बरोबर आयोजित केलेल्या बैठकीत श्री.नायडू बोलत होते.
नामकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच या संदर्भातील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी कृती समितीने मागणी केल्याप्रमाणे आजची बैठक नवी दिल्ली येथे राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या आग्रहाने आयोजित करण्यात आली होती. यावेळी समितीशी बोलताना केंद्रीय मंत्री श्री नायडू यांनी, सुरवातीलाच स्पष्ट केले की,दिबां व्यतिरिक्त इतर कोणाचेही नावाचा प्रस्ताव आमच्या मंत्रालयाला आलेला नाही.निवडणुका आणि राजकारण यांच्यापेक्षा दिबांचे नाव फार मोठे आहे.त्यांच्या नावासाठी कोणाचा अडथलाही नाही,आमचे सरकार दिबांच्या संघर्षाचा सन्मान करते.त्यांच्या नावासाठी आपण केलेल्या संघर्षाच्या आपल्या भावनाही आम्ही जाणतो.दिबांच्या आणि आपल्या संघर्षांचा सन्मान करीत आम्ही  लवकरच दिबांचे नाव विमानतळाला जाहीर करू.राज्य सरकारने पाठवलेला नामकरणाचा प्रस्ताव प्रक्रियेचा भाग म्हणून मंजुरीस पाठवला आहे.याच प्रक्रियेचा भाग म्हणून  PMO आणि कॅबिनेटकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत मंत्रिमहोदयांनी विमानतळ सुरु होण्याआधी नामकरणाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दिबांचे नाव जाहीर करणस आम्हास आनंद वाटेल,असे केंद्रीय मंत्री श्री.नायडू यांनी सांगितले 
 
याप्रसंगी झालेल्या चर्चेत माजी मंत्री कपिल पाटील, सार्व.बाधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,खा.आप्पा बारणे,खा. धैर्यशील पाटील,समितीच्यावतीने अध्यक्ष दशरथदादा पाटील,माजी खा.रामशेठ ठाकूर,माजी.खा.जगन्नाथ पाटील,माजी खा.संजीव नाईक,आ.प्रशांत ठाकूर,आ. राजूदादा पाटील असेच जे.डी.तांडेल,भूषण पाटील,संतोष केणे आदी मान्यवरांनी भाग घेतला होता बैठकीसाठी जे.एम. म्हात्रे,अतुल पाटील,राजेश गायकर,विनोद म्हात्रे दीपक पाटील,शरद म्हात्रे,सुशांत पाटील आणि नागरी उड्डयान मंत्रालयाचे सचिव विमलू वेळणम आणि निर्देशक नयोनिका दत्ता आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment