महिलांसाठी...महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण.... सिटीझन्स युनिटी फोरम,पनवेल व स्त्रीबळ फाउंडेशनचा उपक्रम
पनवेल- समाजातील महिला अत्याचाराच्या वाढलेल्या घटना बघता महिलांनी स्वसंरक्षणासाठी सक्षम असणे हि काळाची गरज आहे आणि त्यासाठी एक प्रयत्न म्हणून सिटीझन्स युनिटी फोरम,पनवेल आणि डॉ.वैशाली साळुंके-धूत यांच्या स्त्रीबळ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सर्व वयोगटातील महिलांसाठी,महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
सदर कार्यक्रम प्रात्यक्षिक स्वरूपाचा असून या प्रशिक्षणाद्वारे स्वयंसुरक्षेसाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि आत्मविश्वास प्राप्त होण्यास मदत होणार आहे.सदर कार्यक्रम विनामूल्य असून आपल्या पनवेलमधील फडके नाट्यगृहात शनिवार दि.५ ऑक्टोबर २०२४ या दिवशी सकाळी ११ ते २ या वेळात आयोजित आहे.
Post a Comment