सीआरपीएफ’ महिला पोलिसावर मित्राचा हल्ला, तळोजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः उसनवारीने घेतलेल्या पैशांची मागणी करणार्या ‘सीआरपीएफ’च्या महिला पोलिसावर तिच्या मित्राने टोकदार वस्तुने हल्ला करुन तिला जखमी केल्याची घटना तळोजा येथे घडली.संतोष शहाजी पांडे (42) असे या आरोपीचे नाव असून तळोजा पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेत जखमी झालेली 34 वर्षीय महिला ‘सीआरपीएफ’मध्ये पोलीस शिपाई या पदावर कार्यरत आहेत.सध्या त्यांची नियुक्ती नागपूर येथे असल्याने त्या कुटुंबियासह नागपूर येथे राहण्यास आहेत.सदर महिला पोलीस नागपूर येथून बँकेच्या कामासाठी तळोजा येथे आल्या होत्या.2022 मध्ये त्या तळोजा फेज-1 मध्ये भाड्याच्या खोलीत राहण्यास होत्या.त्यावेळी त्याच इमारतीत राहणार्या संतोष शहाजी पांडे याची या महिला पोलिसाच्या पतीसोबत मैत्री झाली होती.त्यामुळे संतोष पांडे याचे त्यांच्या घरी नियमित येणे-जाणे असल्याने त्याची तक्रारदार महिला पोलिसासोबत मैत्री झाली होती.त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध देखील निर्माण झाले.त्यामुळे संतोष पांडे आणि महिला पोलीस एकत्र फिरण्यासाठी जात होते.संतोष पांडे याला चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असल्याने त्याने महिला पोलिसाकडे उसनवारीने पैशांची मागणी केली होती.महिला पोलिसाने देखील त्याला 2.99 लाख रुपये उसनवारीने दिले होते.त्यावेळी संतोष पांडे याने 45 दिवसात त्यांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र,त्यानंतर त्याने महिला पोलिसाला पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरु केली.त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला होता.सदर महिला पोलीस नागपूर येथून बँकेच्या कामासाठी तळोजा येथे आल्या होत्या.
यावेळी त्या पेठाली गांव येथील मेट्रो कारशेड जवळ गेल्या होत्या.त्याठिकाणी आरोपी संतोष पांडे दुचाकीवरुन आल्यावर महिला पोलिसाने त्याच्याकडे आपल्या पैशांची मागणी केली असता, त्याने पैसे देण्यास नकार दिला. तसेच त्याच्यासोबत तिचे असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.त्यामुळे त्यांच्यामध्ये बाचाबाची होऊन झटापटी झाली.यावेळी संतोष पांडे याने त्याच्या हातातील टोकदार वस्तुने महिला पोलिसाच्या दंडावर आणि छातीवर हल्ला करुन त्यांना जखमी केले.त्यानंतर त्याने मोटारसायकलवरुन पलायन केले.त्यानंतर महिला पोलिसाने रुग्णालयात उपचार घेऊन तळोजा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
Post a Comment