उद्या अलिबाग येथे शेकापक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेकापची भव्य सभा .... शेकापक्षाच्या अधिकृत उमेदवारांची होणार घोषणा
पनवेल- शेतकरी कामगार पक्षाची अलिबाग येथे उद्या सभा आयोजित करण्यात आली असून या सभेत शेकापक्षाच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठीच्या अधिकृत उमेदवारांची होणार घोषणा केली जाणार आहे.
दि.२२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सभा आयोजित करण्यात आलेली आहे.याप्रसंगी येत्या विधानसभेसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा देखील करण्यात येणार आहे.तरी उद्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी शेतकरी भवन अलिबाग येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment